अंधेरी (प.) येथील लोटस बिझनेस पार्क या कॉर्पोरेट इमारतीला शुक्रवारी लागलेल्या भीषण आगीचा अहवाल अग्निशमन दलाकडून सोमवारी पोलिसांना मिळणार आहे. या अहवालानंतरच कोणावर गुन्हा दाखल करायचा याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे अधिकार्यांनी सांगितले. अग्निशमन दलाच्या अहवालात ही आग नेमकी कशामुळे लागली व त्याला जबाबदार कोण याचाही उल्लेख असणार आहे. यामुळे पोलिसांचे काम हलके होईल, असे सांगण्यात आले. या आगीत शहीद झालेले अग्निशमन दलाचे जवान नितीन इवलेकर यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचाही उल्लेख या अहवालात केला जाणार असल्याने हा अहवाल आमच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याचे तपास अधिकार्याने सांगितले.
या आगग्रस्त इमारतीत अद्याप अग्निशमन दलातर्फे कूलिंग ऑपरेशन चालू असून इमारतीच्या काही मजल्यांतून अद्यापही धूर बाहेर येत असल्याचे सांगण्यात आले. यामुळे या इमारतीत कोणालाही प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. आगीमुळे सुमारे १00 कोटींचे नुकसान झाले असावे, असा अंदाज पोलीस व्यक्त करत आहेत. अभिनेता हृतिक रोशन याचे या इमारतीत पाच मजले असून त्यातील दोन मजले आगीत पूर्णपणे जळाले. यामुळे हृतिक रोशन याने आपल्या कार्यालयात जाण्याची परवानगी पोलीस व अग्निशमन दलाकडे मागितली. पण ती नाकारण्यात आली.
या इमारतीत कॉर्पोरेट कंपन्यांची अनेक कार्यालये असून त्यामध्ये जाण्यासही पोलिसांनी कर्मचार्यांना परवानगी नाकारली आहे. जोपर्यंत अग्निशमन दलाच्या चौकशीचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत इमारतीत जाण्याची कोणालाही परवानगी नाकारण्यात आली आहे. इमारतीमध्ये अनेक सुरक्षा उपायांची कमतरता होती. अग्निशमन व्यवस्था नसल्यामुळे ही आग सर्वत्र पसरली व तिने रौद्ररूप धारण केले. या आगीत शहीद झालेले जवान इवलेकर यांना वरती जाण्याचे कोणी आदेश दिले होते याचाही पोलीस शोध घेत आहेत. इवलेकर यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या अग्निशमन दलाच्या काही अधिकार्यांवरही कारवाई होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.