‘लोटस पार्क’चे परवाने तात्पुरते रद्द - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 July 2014

‘लोटस पार्क’चे परवाने तात्पुरते रद्द

अंधेरीतील 'लोटस बिझनेस पार्क'मध्ये आग विझविण्यासाठी लागणारी प्राथमिक अग्निशमन यंत्रणा नसल्याने तसेच टॉवरने फायर ऑडिट न केल्यामुळे मुंबई पालिकेने या टॉवरला दिलेले सर्व प्रकारचे परवाने तात्पुरते रद्द करण्यात आले आहेत. नियमांची पूर्तता झाल्यानंतरच हे परवाने देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
आगीचे नेमके कारण शोधण्याचे काम पालिकेने सुरू केले आहे. इमारतीचा वीज आणि पाणीपुरवठा बंद करण्याच्या उपाययोजना अग्निशमन दलाने सुरू केल्या आहेत. इमारत बांधताना आपत्कालीन व्यवस्थापनाचे सर्व नियम पाळण्यात आले आहेत का, पालिका व अन्य प्राधिकरणाच्या परवानग्या, आग विझवण्याची साधने, फायर ऑडिट इमारत व्यवस्थापनाने पूर्ण केली होते का, याची सखोल चौकशी करण्यात येत आहे.

दरम्यान, मुंबईतील सर्व गगनचुंबी टॉवरमधील आग प्रतिबंधक यंत्रणा व्यवस्थित सुरू आहे का, याची तपासणी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यंत्रणा सुरू नसल्यास संबंधितांवर फायर अॅक्टनुसार कठोर कारवाई करण्याचे पालिकेने ठरवले आहे.

Post Bottom Ad