पालिका मुंबईमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प राबवणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 July 2014

पालिका मुंबईमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प राबवणार

मुंबई / अजेयकुमार जाधव 
जगभरात सौर ऊर्जेच्या वापराचे प्रमाण वाढत असताना मुंबईमध्ये मात्र सौर ऊर्जेकडे पर्याय म्हणून पाहण्यास दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घेवून मुंबईमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प राबवून वीज निर्मितीचा आणखी एक पर्याय निर्माण करावा अशी मागणी नगरसेवक अमित साटम यांनी केली होती. यानुसार पालिकेने मुंबईमध्ये "मुंबई सोलार मिशन" अंतर्गत सौरऊर्जा प्रकल्प राबविणार आहे. 
भारतामधील अनेक राज्यांमध्ये सौरऊर्जेचे मोठमोठे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. याचा एक भाग म्हणून देशातल्या ६० शहरांना " सोलार सिटीज इनीशीएटीव्ह " सौरऊर्जेचे केंद्र बनवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. परंतू या शहरांमध्ये मुंबई शहराचा समावेश करण्यात आलेला नाही.  मुंबई मध्ये साधारणपणे ३०० दिवस चांगला सूर्यप्रकाश मिळत असूनही हे शहर सौरऊर्जेचे केंद्र बनण्याच्या संधीला मुकणार आहे. हि वस्तुस्थिती लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेने मुंबई मध्ये सौरऊर्जेचा प्रकल्प राबवून वीज निर्मितीचा आणखी एक पर्याय निर्माण करावा अशी मागणी साटम यांनी केली आहे. 

या मागणी नुसार एक तांत्रिक समिती गठीत करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या समितीमध्ये महानगरपालिका, ओबजर्वर रिसर्च फाउंडेशन, महाराष्ट्र ऊर्जा विकास संस्था, भारतीय तंत्रज्ञान संस्था, बेस्ट, आणि सार्वजनिक बांधकाम विभाग सत्यादि संस्थांमधील प्रतिनिधी सदस्य असणार आहेत. सदर समिती "मुंबई सोलार मिशन" राबविण्याबाबत योग्य ते धोरणात्मक निर्णय घेईल व नंतर हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS