मुंबईत ६0 टक्के 'हायड्रंट' बंद असून ते जमिनीखाली दबलेले आहेत. आग लागल्यानंतर त्यांचे महत्त्व लक्षात घेता पुनरुज्जीवन करावे लागणार आहे. त्यांचे पुनरुज्जीवन करताना ते कालबद्ध करावे लागेल आणि यासाठी पालिकेचा नियोजन, जल यांच्यासह तीन-चार विभागांच्या अभियंत्यांशी चर्चा करणार आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी पत्रकारांना दिली. लोटसला आग लागल्यानंतर अग्निशमन दलाचे २0 बंब आणि १२ टँकर्स घटनास्थळी पोहचले होते. यामुळे आग शमवताना पाण्याचा तुटवडा जाणवला नाही उलट पाणी शिल्लक राहिले, असे सांगून देशमुख म्हणाले, भविष्यात दोन अग्निशमन केंद्रांमध्ये चार किलोमीटरचे अंतर असणार आहे. ही योजना येत्या तीन वर्षांत अमलात येणार असून नव्या अग्निशमन केंद्रांसाठी पालिका जागांचा शोध घेत आहे. इंदिरा गोदीतील अग्निशमन केंद्रांची इमारत जर्जर झाली असून तिचे 'स्ट्रक्चरल ऑडिट' करण्यात आले आहे. ही इमारत पाडून ती पुन्हा बांधावी लागेल, अशी माहिती त्यांनी दिली.
Post Top Ad
22 July 2014
Home
Unlabelled
मुंबईत ६0 टक्के 'हायड्रंट' बंद
मुंबईत ६0 टक्के 'हायड्रंट' बंद
Share This
About Anonymous
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.