मुंबई : मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या इमारतीत मंगळवारी विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे तब्बल २५ मिनिटे अंधार होता. ब्रिटिशकालीन पालिका मुख्यालयाच्या इमारतीत वीज असणे अनिवार्य आहे; अन्यथा कामकाजात मोठा अडथळा येतो. मंगळवारी यापेक्षा वेगळी स्थिती नव्हती. इतकेच काय तर अनेक जण पालिकेच्या लिफ्टमध्ये अडकून पडले होते. २५ मिनिटांनी वीजपुरवठा सुरळीत सुरू झाला आणि लिफ्टसह विविध कार्यालयांतील कर्मचार्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
पालिका मुख्यालयाच्या जुन्या आणि नवीन इमारतीचा वीजपुरवठा सायंकाळी ४ वाजून ९ मिनिटांनी अचानक खंडित झाला. त्यामुळे मुख्यालयातील अनेक कार्यालयांचे कामकाज थांबले. पाच मिनिटांत वीजपुरवठा पूर्ववत होईल, अशी सर्वांचीच अपेक्षा होती, मात्र तब्बल २५ मिनिटे मुख्यालयातील वीज गायब झाली. त्यामुळे तेथील अनेक कार्यालयांतील कामकाजावर याचा विपरित परिणाम झाला. पालिका मुख्यालयात कामकाजासाठी अनेक अभ्यागतांची गर्दी असते. तसेच पालिका कर्मचार्यांचीही पालिकेतील विविध मजल्यांवरील कार्यालयात कामानिमित्त ये-जा असते. ही बाब लक्षात घेता वीजपुवठा खंडित झाल्यामुळे पालिकेतील लिफ्ट मध्येच बंद पडली. त्यामुळे अनेक जण यात अडकून पडले. तब्बल २५ मिनिटांनी वीजपुरवठा सुरळीत झाला आणि लिफ्टमध्ये अडकून पडलेल्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. दरम्यान, पालिकेच्या जुन्या आणि नवीन इमारतीतील वीजपुरवठा खंडित झाला असला तरी आयुक्त, महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांच्या दालनातील वीजपुरवठा मात्र सुरू असल्याने तेथे याचा परिणाम जाणवला नाही.
No comments:
Post a Comment