मुंबई (रशिद इनामदार)(दि ६ जून २०१३ )-
कॉंग्रेस पुढार्यांनी राजकीय हेतूनी प्रेरित होऊन समाजातील शांती व सुव्यवस्था भंग व्हावी यासाठी तथागत भगवान बुद्ध आणि डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांच्या केलेल्या विटंबने च्या निषेधार्थ ७ जून रोजी मोर्चाचे आयोजन केले आहे .
हा मोर्चा शेतकरी कामगार पक्ष , भारतीय जनता पार्टी , शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या महायुतीने रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केला आहे . महायुतीच्या दृष्टीने हा भयंकर गुन्हा आहे असे प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे . हे निंदनीय कृत्य कॉंग्रेस पुढार्यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना अट्रोसिटिच्या गुन्ह्यामध्ये अडकविण्याच्या हेतूने मुद्दाम केले होते . या कृतीतून काँग्रेसचा राजकीय हेतू साध्य करण्याचा प्रयत्न मात्र फसला आहे . कायद्याचा दुरुपयोग कॉंग्रेस ने राजकीय स्वार्थासाठी करण्याचा हा खूपच निंदनीय प्रकार असल्याचे कामोठेकरांकडून बोलले जात आहे .
तरी या गुन्ह्यातील खर्या समाज कंटकांना अटक करून कडक कारवाई करण्यात यावी यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आले आहे . या मोर्च्यात रायगड मधील आर पी आय जिल्हा अध्यक्ष जगदीश गायकवाड,शिवसेना जिल्हाप्रमुख बबनदादा पाटील , उरणचे आमदार विवेक पाटील,शेकाप जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील , भाजप जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब पाटील सहभागी होणार आहेत .
No comments:
Post a Comment