मुंबई : ऑल इंडिया स्टुडण्ट्स फेडरेशन व युथ फेडरेशनच्या वतीने सुरू असलेले आंदोलन मंगळवारी तीव्र झाले असून दुपारी मंत्रालय प्रवेशद्वाराजवळ तीव्र निदर्शने करण्यात आली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्याना अटक करून आझाद मैदानात आणण्यात आले. १0 जुलैपासून बीएएमएसच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू कराव्यात. त्यांना अन्य कॉलेजमध्ये सामावून घ्यावे. २१ कॉलेजमधील १0१९ विद्यार्थ्यांचा प्रश्न गंभीर असताना सरकार लक्ष घालत नाही म्हणून ही निदर्शने करण्यात आली. वैद्यकीय शिक्षणमंत्री या प्रश्नांकडे आश्वासनांशिवाय काहीही कार्यवाही करत नाही, असे सांगत फेडरेशनचे अध्यक्ष कॉम्रेड फिडेल चव्हाण म्हणाले की, सरकाने अजूनही या प्रश्नांकडे गांभीर्याने न पाहिल्यास हे आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला.
Post Top Ad
17 July 2013
Home
Unlabelled
स्टुडण्ट्स फेडरेशनची मंत्रालय प्रवेशद्वारावर निदर्शने
स्टुडण्ट्स फेडरेशनची मंत्रालय प्रवेशद्वारावर निदर्शने
Share This
About Anonymous
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment