अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यासाठी अजून किती वर्षे थांबायचे- डॉ. नरेंद्र दाभोळकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 July 2013

अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यासाठी अजून किती वर्षे थांबायचे- डॉ. नरेंद्र दाभोळकर

मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करण्यासाठी सरकारने आता वेळकाढूपणाचे धोरण राबवू नये. विवेकवादी व लोकशाही मार्गाने आम्ही १८ वर्षे थांबलो, अजून किती वर्षे थांबायचे असा सवाल डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.

अंधश्रद्धेचा कायदा प्रत्येक अधिवेशनात येतो व मंजूर न होता पुढील अधिवेशनात पुन्हा येतो. १८ वर्षे हा कायदा वारकरी बाधवांच्या सूचनेप्रमाणे २0 लहान-मोठे बदल या कायद्याच्या प्रारुपात झाले आहेत. त्यानंतरही जर कोणी विरोध करत असेल तर त्यामागचे राजकारण समजून घेऊन निर्धाराने हा कायदा मंजूर करावा. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मौन सोडावे व सक्रिय सामाजिक इच्छाशक्ती दाखवून या पावसाळी अधिवेशनात हा कायदा दोन्ही सभागृहांत मंजूर करावा, अशी मागणी दाभोळकरांनी केली. या कायद्यामुळे श्रीमंतांची अंधश्रद्धा व गरीबांची अंधश्रद्धा असे दोन भाग पडणार आहेत असे दाभोळकर म्हणाले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad