मुंबई : चौकशी, तपासणी, हिशोब आदी गोंडस नावाखाली सरकारचा अपंग आश्रमशाळेबाबतचा जो गोंधळ सुरू आहे, तो अपंग विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर व संस्थाचालकांवर जाणीवपूर्वक अन्याय आहे, असा आरोप अपंग आश्रमशाळा समितीचे अध्यक्ष दिनेश गुणाले व शशिकांत गाडेकर यांनी आझाद मैदानात सोमवारी केला.
१७७ अपंग आश्रमशाळांतील ७ हजार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा व संस्थाचालक, शिक्षक व इतर कर्मचार्यांवर वेळकाढूपणाचे धोरण अवलंबून सरकारने तो कारभार सुरू केला आहे तो फारच अन्यायकारक असल्यामुळे अपंग विद्यार्थी व शिक्षकांनी सोमवारपासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. थेट अनुदान तत्त्वावर मान्यता प्रदान करावी. अहवाल समाधानकारक नसल्याचे भांडवल करून या क्षेत्रातील झारीतील शुक्राचार्य या संस्थांना अनुदान तत्त्वावर मान्यता देत नाहीत. शासनाची पूर्वपरवानगी घेऊन सुरू असलेल्या या शाळांमध्ये ग्रामीण भागातील अपंग विद्यार्थी, दहा वर्षांपासून सेवा देणारे कर्मचारी, शिक्षक दिशाहीन झाले आहेत, असे दिनेश गुणाले व शशिकांत गाडेकर यांनी या वेळी सांगितले.
No comments:
Post a Comment