मुंबई : रेल्वेच्या डब्यातून बेकायदा प्रवास करणार्या पोलिसांचा वाढता टक्का सध्या रेल्वे पोलीस दलासाठी (आरपीएफ) डोकेदुखी ठरला आहे. पोलीस कर्मचार्यांच्या या वाईट सवयीला लगाम घालण्यासाठी आरपीएफचे वरिष्ठ अधिकारी आता थेट मुंबई पोलीस आयुक्तांशी पत्रव्यवहार करणार आहेत. आरपीएफने गेल्या आठवड्यात बेकायदा प्रवास करणार्या जवळपास ५0 प्रवाशांना ताब्यात घेतले होते, त्यात १७ पोलीस कर्मचार्यांचा समावेश होता. अपंगांसाठी राखीव असलेल्या डब्यात घुसखोरी वाढल्याच्या अनेक तक्रारी आरपीएफकडे प्राप्त झाल्या. त्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आरपीएफने गतवर्षी हाती घेतलेल्या विशेष मोहिमेदरम्यान ९0 पोलीस जाळ्यात सापडले होते. ते पोलीस बेकायदा प्रवास करताना निदर्शनास आले होते. पोलिसांच्या बेकायदा प्रवासामुळे अपंग प्रवाशांना डब्यात चढणे-उतरणे मुश्कील बनत असल्याचे चित्र आहे. गेल्या आठवड्यातही १७ पोलीस कर्मचार्यांची अपंगांच्या डब्यातील घुसखोरी उघडकीस आल्यामुळे आरपीएफने आता थेट मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र धाडण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाच्या वतीने विभागीय रेल्वे व्यवस्थापकांद्वारे हे पत्र पाठवले जाणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर अंबरनाथ, बदलापूर यांसारख्या स्थानकांवर बहुतांश पोलीस अपंगांच्या राखीव डब्यातून प्रवास करत असल्याचे आरपीएफचे अधिकारी सांगतात. ३ जुलै रोजी पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर राबवलेल्या मोहिमेदरम्यान आरपीएफने २७ जणांना दंड ठोठावला. त्यात ८ पोलिसांचा समावेश होता तर ६ जुलै रोजी दादर स्थानकातून आणखी २0 प्रवाशांना बेकायदा प्रवास केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले. त्यात ९ पोलीस कर्मचारी होते. त्यांना प्रत्येकी २५५ रुपयांच्या दंड वसुलीनंतर सोडून देण्यात आले होते. दरम्यान, पोलिसांच्या या बेकायदा प्रवासाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी अपंग प्रवासी करत आहेत. |
Post Top Ad
10 July 2013
Home
Unlabelled
पोलिसांच्या बेकायदा प्रवासाची आरपीएफला डोकेदुखी
पोलिसांच्या बेकायदा प्रवासाची आरपीएफला डोकेदुखी
Share This
About Anonymous
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment