मुंबई : पालिकेच्या एफ/उत्तर सरदार नगर आणि प्रतीक्षा नगर मनपा मराठी शाळांवर अधिकार्यांकडून कुर्हाड चालवण्याचे प्रकरण चाललेले असताना त्याच विभागातील खुद्द पालिका शिक्षणाधिकार्यांच्या दादरमधील हिंदू कॉलनीतील मुख्य कार्यालय असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावर अनेक वर्षांपासून भरणार्या हिंदू कॉलनी मनपा मराठी शाळा बंद करण्याचा घाट संबंधित अधिकार्यांनीच घातल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली असून त्यासाठी विभागीय निरीक्षकांनी शाळा प्रमुखांवर आमची शाळा बंद करा, असे लिहून द्या म्हणून प्रचंड दबाव आणल्याचे सांगण्यात येते. तर मुंबईतील मराठी शाळांबाबत काय स्थिती असेल याबाबत शिक्षण विभागात सुरस चर्चा ऐकू येत आहेत. पालिकेच्या एफ/उत्तर विभागात हिंदू कॉलनीत पालिका शिक्षणाधिकार्यांचे मुख्यालय आहे. जेथून पालिका शिक्षण विभागाचा पूर्ण कारभार हाताळला जात आहे. याच इमारतीच्या तळमजल्यावर गेल्या पाच ते सहा दशकांपासून उच्च प्राथमिक मराठी शाळा चालवली जात आहे. सद्यस्थितीत या शाळेत ३६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.प्रशासनाच्या नाकर्त्या भूमिकेमुळे या शाळेचा पट घसरत गेला आणि प्रशासनाने हळूहळ शाळेच्या ताफ्यातील सर्व वर्ग खोल्या हिरावून घेत तेथे आपली कार्यालये थाटली. आता शाळेच्या ताफ्यात असलेल्या दोन वर्ग खोल्याही हिसकावून घेण्यासाठी अधिकार्यांनी मराठी विद्यार्थ्यांना रस्त्यावर आणण्याचे ठरवले असल्याचे सांगण्यात येते. त्यासाठी कोणतेही सबळ कारण नसल्याने अधिकार्यांनी नामी शक्कल लढवत शाळाप्रमुखांवरच दबाव आणण्यास सुरुवात केली असल्याचे समजते. आमच्या शाळेची विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे आमची शाळा बंद करून आमच्या शाळेतील मुलांची सोय अन्य शाळेत करावी, अशा आशयाचा प्रस्ताव शाळेच्या मुख्याध्यापकांनी स्वत: लिहून द्यावा म्हणून त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचे कळते. त्यामुळे शाळेतील शिक्षक भयभीत झाले असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, शाळा बंद केल्यास या शाळेतील मुलांनी जायचे कोठे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. |
Post Top Ad
06 July 2013
Home
Unlabelled
शिक्षणाधिकारी कार्यालय इमारतीतील पालिकेची मराठी शाळा बंद करण्याचा घाट
शिक्षणाधिकारी कार्यालय इमारतीतील पालिकेची मराठी शाळा बंद करण्याचा घाट
Share This
About Anonymous
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment