मुंबई : एका डॉक्टरचा क्षयरोगाने मृत्यू होणे ही घटना सरकारसाठी, रुग्णालयासाठी व समाजासाठी शरमेची गोष्ट आहे. सरकारने डॉक्टरांच्या व सामान्य रुग्णांच्या समस्येकडे गाभीर्याने पाहिले नाही, तर हा रोग भयावह रूप धारण करेल, अशी भीती 'मार्ड' या डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉ. संतोष वाघमारे यांनी शुक्रवारी पत्रकार संघ येथे व्यक्त केली.
डॉ. समिक्षा खांदारे हिचा क्षयरोगाने मृत्यू होतोय. ते ही भारताची आर्थिक राजधानी असणार्या मुंबई शहरात. यासारखी शरमेची गोष्ट सरकारला व आरोग्य विभागाला नसावी, असे सांगत डॉ. वाघमारे म्हणाले. उत्तराखंडापेक्षा जास्त मृत्यू टीबीने होत आहेत. पूर, आग, आदी दुर्घटना कधीतरी घडतात, मात्र टीबीची लढाई रोजची आहे. ९ हजार रुग्ण दरवर्षी टीबीने मुंबईत मृत्युमुखी पडतात. १५00 रुग्ण तर रुग्णालयातच दगावतात. अशा या भयंकर समस्येकडे सरकारने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. डॉक्टरांना सरकारी व पालिका रुग्णालयात राहण्याची, आहाराची, कामाच्या तासाची आदी प्रकारे होईल तेवढी शिक्षा सरकार देत आहे. या सर्व शिक्षमुळे २0/२५ डॉक्टरांना टीबीने ग्रासले आहे. सायन १५, नायर २, केईएम २, इतर ठिकाणी उर्वरित असे २0/२५ रुग्ण टीबीने ग्रासले आहेत. डॉक्टरच असे आजारी पडत असल्यामुळे खाजगी रुग्णालयांकडे रुग्ण धाव घेत आहेत. त्यामुळे सरकारने या प्रश्नांकडे गांर्भीयाने पाहत योग्य उपचारासाठी खाजगी रुग्णालयाप्रमाणे मशनरी, तंत्रज्ञान, सोयीसुविधा उपलब्ध केल्या पाहिजेत. यामध्ये जर फरक पडला नाही तर दर ४ माणसांमागे १ रुग्ण क्षयरोगाचा सापडेल. या वेळी ओआरएफचे अध्यक्ष सुधेंद्र कुलकर्णी, डॉ. दिपेश रेड्डी, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment