विरोधी पक्षनेत्यांचे पालिका आयुक्तांना पत्रमुंबई : मुंबई महानगरपालिकेकडून खेळाची मैदाने आणि मनोरंजन उद्याने काही संस्थांना काळजीवाहू तत्त्वावर सांभाळण्यात दिली आहेत. या संस्थांना देण्यात आलेल्या भूखंडाबाबत आपणास लिखित स्वरूपात माहिती उपलब्ध करून घ्यावी, अशी विनंती विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम यांनी पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. मुंबईत एकूण ३३७ मनोरंजन मैदाने, २२८ खेळाची मैदाने आणि २४२ उद्याने आहेत. यापैकी काही भूकंड पालिकेने काळजीवाहू तत्त्वावर मातोश्री क्लब, प्रबोधन, दहिसर स्पोर्ट फाऊंडेशन, गोरेगाव येथील आडे भास्कर, कमळ विहार क्लब व यांचसह जिमखाना इत्यादींसह अन्य खाजगी संस्थांना देण्यात आलेल्या भूखंडाबाबत माहिती देण्याची विनंती आयुक्तांकडे केली आहे. तसेच ज्या संस्थांना भूखंड दिले आहेत ते किती वर्षाच्या कालावधी का दिले आहेत व कालावधी कधी संपुष्टात येणार आहे, असे सवाल निकम यांनी केले असून ही माहितीही त्यांनी आयुक्तांकडे मागितली आहे. |
Post Top Ad
13 July 2013
Home
Unlabelled
काळजीवाहू तत्त्वावर खाजगी संस्थांना देण्यात आलेल्या भूखंडांची माहिती द्यावी
काळजीवाहू तत्त्वावर खाजगी संस्थांना देण्यात आलेल्या भूखंडांची माहिती द्यावी
Share This
About Anonymous
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment