पालिका सेवेतील डॉक्टरांच्या सुविधा वाढवणार - महापौर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 July 2013

पालिका सेवेतील डॉक्टरांच्या सुविधा वाढवणार - महापौर

डॉक्टरचा क्षयरोगाने मृत्यू......... मुंबई : सायन रुग्णालयातील डॉ. समिधा खंदारे यांचा नुकताच क्षयाने मृत्यू झाला होता. त्या पार्श्‍वभूमीवर पालिका रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या सर्व सोयीसुविधांमध्ये वाढ करण्यात येणार आहे.तसेच डॉक्टरांना क्षयाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून विशेष काळजी घेण्यात येणार असल्याचे महापौर सुनील प्रभू यांनी स्पष्ट केले.

गेल्या काही काळात मुंबईत एमडीआर क्षयरोगाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. क्षयरोगबाधित रुग्ण डॉक्टरांच्या संपर्कात येत असल्यामुळे त्यांनाही क्षयाची बाधा होत असल्याचे दिसून आले आहे. निवासी डॉक्टरांना मनपाच्या वतीने सध्या १0 टक्के सबसिडीसह आहार देण्यात येत आहे. डॉक्टरांच्या आहारामध्ये प्रोटीनयुक्त आणि अधिक सकस आहार देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक तीन महिन्यांतून एकदा वैद्यकीय तपासणीही करण्यात येत आहे. एमडीआर क्षयाची तीव्रता कमी करण्यासाठी धारावी आणि गोवंडी येथे जीन एक्स्पर्ट्सप्रणाली अंमलात आणण्यात आली आहे. आगामी काळात कांदिवली, राजावाडी आणि शिवडी येथे ही प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती महापौरांनी दिली.

टीबी सप्ताहाचे आयोजन
ओआरएफ व मार्डच्या संयुक्त विद्यमाने ८ ते १४ जुलै असा मुंबई टीबी सप्ताह होत आहे. जनतेत टीबीच्या आजाराबाबत जनजागृती, सरकारच्या निष्क्रियतेची माहिती टीबीचे प्रश्न विचारा, बक्षीस मिळवा, असा चालता बोलता कार्यक्रम कॉलेज, शाळा, रेल्वे स्टेशन आदी गर्दीच्या ठिकाणी पोस्टर्स व नाट्यमय कार्यक्रम होणार आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad