विशेष मागास प्रवर्गाचे धरणे आंदोलन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 July 2013

विशेष मागास प्रवर्गाचे धरणे आंदोलन

मुंबई : १९९४ मध्ये इतर मागास प्रवर्गात समाविष्ट असलेल्या जातीपैकी पद्मशाली समाजासह ४१ जाती व उपजातीच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी विशेष मागास प्रवर्गाची निर्मिती करण्यात आली. २ टक्के स्वतंत्र आरक्षण व १२ सवलती जाहीर झाल्या. मात्र त्याची अंमलबजावणी १८ वर्षांनंतरही करण्यात आली नाही. त्यामुळे 'विशेष मागास प्रवर्ग अन्याय निवारण कृती समिती, महाराष्ट्र'च्या वतीने सोमवारपासून आझाद मैदानात धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. 

या वेळी समितीचे सचिव सुदर्शन बेगा, उपाध्यक्ष महादेव ढोकळे, सरचिटणीस सुरेश पद्मशाली, भिवंडी युवा अध्यक्ष श्रवण कुमार, ढोकळे, वल्लाळ, शातलवार, त्र्यंबके, सिरिमल्ले, कोरे, दिकोंडा आदी पदाधिकारी उपस्थित होते. या वर्गासाठी राज्यात आश्रमशाळा सुरू कराव्यात, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची १00 टक्के प्रतिपूर्ती करण्यास मान्यता द्यावी, १९९५ च्या आधारे जातीचे प्रमाणपत्र द्यावे, या व इतर सहा मागण्यांच्या निवेदनावर मुख्यमंत्र्यांनी त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा हे आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा महादेव ढोकळे यांनी या वेळी दिला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad