मुंबई – मध्य रेल्वे वरील डीसी (डायरेक्ट करंट) वीजप्रणाली एसी (अल्टरनेट करंट) वीजप्रणालीत बदल करण्याची शिफारस रेल्वे सुरक्षा आयुक्तालयाने रेल्वे बोर्डाकडे केली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने त्यासाठी हरकत नसल्याचेही बोर्डाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. अशी माहिती रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांनी दिली. पुढील आठवडय़ापर्यंत या शिफारशीला रेल्वे बोर्डाकडून हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे.
कुर्ला ते ठाणे, ठाणे ते कल्याण आणि कुर्ला ते छत्रपती शिवाजी टर्मिनस दरम्यान डीसी वीज प्रणालीचे एसी प्रणालीत रूपांतर करण्यास मध्य रेल्वेच्या सुरक्षा आयुक्तालयाने परवानगी दिली आहे. याबाबत कुठलीही हरकत नसल्याचे पत्र आयुक्तालयाने रेल्वे बोर्डाला गुरुवारी पाठवले आहे. त्यामुळे लवकरच हे काम पूर्ण केले जाईल असे म्हटले जात आहे.
चार दिवसांसाठी दोन तासांचा मेगाब्लॉक घेऊन हे काम पूर्ण करणे शक्य होणार असल्याचेही बक्षी म्हणाले. डीसीचे एसीमध्ये रुपांतर झाल्यानंतर विजेची बचत होणार आहे तसेच गाडय़ांचा वेगही वाढणार आहे. मध्य रेल्वेने या साठी आवश्यक तयारी पूर्ण केली असून रेल्वेबोर्डाच्या मंजुरीनंतर हे काम सुरू केले जाणार आहे.

No comments:
Post a Comment