यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली असून येत्या ३१ जुलै पर्यंत ही प्रवेश प्रक्रिया सुरु राहणार आहे. निर्धारित तारखेनंतर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विलंब शुल्क भरावे लागेल. विलंब शुल्क रुपये २००/- सह प्रवेशची मुदत १ ते १६ ऑगस्ट पर्यंत राहील तर अतिविलंब शुल्क रुपये ५००/- सह दि. १७ ते ३० ऑगस्ट २०१३ पर्यंत राहील.
मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून पूर्वतयारी शिक्षणक्रम, कला, वाणिज्य, संगणक, विज्ञान आणि तंत्रज्ञान, शिक्षणशास्त्र, आरो ग्य विज्ञान, शैक्षणिक सेवा, सहयोग व विशेष उपक्रम केंद्राच्या तसेच निरंतर शिक्षण विद्याशाखेच्या अनेक शिक्षणक्रमांचा पर्याय खुला आहे. प्रामुख्याने बी.ए.,बी.ए. जनसंज्ञापन वृत्तपत्रविद्या, बी.कॉम., एम.कॉम., एम.बी.ए., बी.आर्च.,एम.आर्च., बी.लिब., एम.लिब., डी.एम.एल.टी., डी.सी.एम., रुग्ण सहायक / सहायिका प्रमाणपत्र शिक्षणक्रम, दाई प्रशिक्षण प्रमाणपत्र शिक्षणक्रम, योगा, P.G. DIPLOMA IN HOSPITAL AND HEALTH CARE MANAGEMENT असे विविध शिक्षणक्रम चालविले जातात. या विद्यापीठाने विविध कारणांमुळे शिक्षणापासून वंचित असलेल्यांना, नोकरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना इतर विद्यापीठांच्या समकक्ष पदवी व पदविका शिक्षणक्रमांच्या संधी देखील उपलब्ध करून दिल्या आहेत.
दहावी / बारावी पास-नापासांना उच्चशिक्षणाची संधी
विद्यापीठाने ‘पूर्वतयारी शिक्षणक्रमाच्या’ माध्यमातून दहावी / बारावी पास-नापास विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी उपलब्ध करून देत,त्यांच्यासाठी शिक्षणाचे दालन पुन्हा एकदा खुले केले आहे. हा शिक्षणक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना बी.ए. (मराठी/ हिंदी/उर्दु), बी.कॉम. (मराठी/इंग्रजी), B.Sc. in Hospitality and Tourism Studies, DCS, CBPM अशा विविध शिक्षणक्रमांना प्रवेश घेऊन आपले पुढील शिक्षण पूर्ण करता येईल. पूर्वतयारी शिक्षणक्रमाचे शुल्क केवळ ६५०/- रुपये एवढे आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः अभ्यासकेंद्रांवरून अर्ज घ्यावा व प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी. शिक्षणक्रमाची सर्व पुस्तके विद्यापीठामार्फत देण्यात येणार आहेत याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. प्रवेश अर्ज विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी कोणाही मध्यस्था-मार्फत प्रवेश प्रक्रिया पार पाडू नये असे आवाहन विद्यापीठाने केले आहे.
अधिक माहितीसाठी 022-23874186 किंवा 022-23874187 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा अथवा विद्यापीठाच्या http://ycmou. digitaluniversity.ac या संकेतस्थळास भेट द्यावी.
No comments:
Post a Comment