मरे करणार डिमेलो रोडला वाहनतळाची सुविधा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 July 2013

मरे करणार डिमेलो रोडला वाहनतळाची सुविधा

मुंबई : मुंबईतील सर्वात महत्त्वाचे आणि प्रवाशांची नेहमीच ये-जा असणारे स्टेशन म्हणजे सीएसटी रेल्वे स्थानक. सीएसटी स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १८ वर पोहचण्यासाठी प्रवाशांना मोठय़ा प्रमाणात कसरत करत प्लॅटफॉर्म गाठावे लागते. त्यामुळे प्रवाशांचे हालही होतात आणि वेळही जातो. परिणामी, मध्य रेल्वे प्रशासनाने आपल्या प्रवाशांना चांगल्या सोयी-सुविधा पुरवण्याच्या हेतूने वाहनतळापासून विविध सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. वाडीबंदर येथील डिमेलो रोड येथे वाहनतळ, स्टेशनवर दोन स्टॉल्स आणि प्रवाशांना बसण्यासाठी आसनांची सोय करण्यात येणार आहे.

सीएसटी स्थानकात लांब पल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांसाठी प्लॅटफॉर्म क्रमांक ९ ते १८ आहेत. त्यापैकी १४ ते १८ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मची लांबी जास्त असल्याकारणाने तेथून २४ डब्यांच्या गाड्या चालवण्यात येतात. त्यामुळे हे प्लॅटफॉर्म गाठण्यासाठी प्रवाशांना इतर प्लॅटफॉर्म पार करत जावे लागते. परिणामी, गर्दीमुळे प्रवाशांचे हाल होतात. प्रवाशांचे हाल कमी करण्यासाठी मध्य रेल्वेच्या वाडीबंदर येथील रिकाम्या जागेवर सुमारे १५0 गाड्या पार्क केल्या जाऊ शकतील तसेच दोन स्टॉल्स आणि बसण्यासाठी आसनांची सोय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय ईस्टर्न फ्री वेमुळे वाडीबंदरला पोहोचण्यास प्रवाशांना कोणताही त्रास होणार नसल्यामुळे प्रवाशांसाठी तेथे टॅक्सी स्टॅण्डची सुविधाही पुरवण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अतुल राणे यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad