मुंबई होणार वायफाय - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 July 2013

मुंबई होणार वायफाय

मुंबई - तरुण पिढी आणि कॉर्पोरेट क्षेत्रात क्रेझ असणारे ‘वायफाय’ लवकरच मुंबईकरांना मुंबईत कोठूनही आपल्या मोबाईल तसेच संगणकावर ‘ऍक्सेस’ करता येणार आहे. मुंबई शहर ‘वायफाय’ करण्याची घोषणा शिवसेनेने आपल्या वचननाम्यात केली होती. त्यादृष्टीने महापालिकेने पावले उचलली असून ‘वायफाय’साठी आवश्यक असलेली ‘वेब सुरक्षा’ तसेच हॅकिंगपासूनचे संरक्षण या तांत्रिक बाबींची तपासणी सुरू असल्याची माहिती महापौर सुनील प्रभू यांनी दिली.

मुंबईभर वायफाय यंत्रणा राबविण्यात आल्यास इंटरनेट तसेच ई-मेल करणे सहज शक्य होणार आहे. एरवी मोबाईल तसेच कॉम्प्युटरला इंटरनेटसाठी लावण्यात येणार्‍या डेटाकार्डला नेटवर्कच्या मर्यादा असतात, मात्र मुंबईतील नाक्यानाक्यावर वायफाय उपलब्ध झाल्यास तरुण पिढी तसेच कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचार्‍यांना कोठूनही इंटरनेट पाहणे तसेच मेल करणे शक्य होणार आहे. यासाठी फक्त आपल्या मोबाईल किंवा संगणकावरून वायफाय सर्च करावे लागणार आहे.

‘वायफाय’ यंत्रणा मुंबईकर उभारण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहरात अशी यंत्रणा उभारणे अत्यावश्यक आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून निविदा मागविण्यात येणार आहे. महापालिकेची मुख्य इमारत आणि विभाग कार्यालयात लवकरच वायफाय यंत्रणा सुरू केली जाईल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad