चित्रा साळुंखे प्रकरणाची सुनावणी किल्ला कोर्टात सुरू करावी - उच्च न्यायालय - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 July 2013

चित्रा साळुंखे प्रकरणाची सुनावणी किल्ला कोर्टात सुरू करावी - उच्च न्यायालय

मुंबई - सिद्धार्थ  विधी महाविद्यालयातील  प्रा. चित्रा साळुंखे यांनी महाविद्यालयाचे  प्रभारी प्राचार्य अशोक  इनामदार  यांच्या विरोधात दाखल  केलेल्या लैंगिक  छळ प्रकरणाची सुनावणी किल्ला  कोर्ट  महानगर  दंडाधिकाऱ्यांपुढे  लगेच  सुरू  करण्याचे  निर्देश  मुंबई  उच्च न्यायालयाचे  न्या. के. यू. चांदिवाल  यांनी दिले. तर माझ्यावर झालेले  आरोप  निराधार आहेत,  अशी घटना कधीच झालेली नाही, यामुळे माझ्यावरील  लैंगिक  छळाचा गुन्हा रद्द  करण्याची मागणी इनामदार यांनी उच्च न्यायालयात  सादर  केलेल्या प्रतिज्ञापत्रात  केली आहे.

ही घटना १९ जानेवारी २००५ रोजी झाली होती. या घटनेनंतर साळुंखे यांनी इनामदार यांच्याविरोधात आझाद मैदान पोलिस ठाण्यात लैंगिक अत्याचार व अॅट्रॉसिटीची तक्रार दाखल केली होती. तसेच त्यांनी महिला आयोग व मुंबई विद्यापीठाकडेही तक्रार दाखल केली होती. त्यांच्या चौकशीनंतर मुंबई विद्यापीठाने माजी न्या. के. के. बाम यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली होती.
या समितीने इनामदार यांना निर्दोष ठरवले होते. त्यामुळे साळुंखे यांनी इनामदार यांच्याविरोधात उच्च न्यायालयात फौजदारी पुनर्विचार अर्ज दाखल केला. या अर्जावर उच्च न्यायालयात न्या. चांदिवाल यांच्यापुढे सुनावणी झाली असता, इनामदार यांनी माझ्यावरील आरोप निराधार आहेत, अशी घटना कधी घडलेली नाही, या आशयाचे प्रतिज्ञापत्र सादर केले.
दरम्यान, इनामदार यांनी साळुंखे यांच्यावर लिहिलेली कविता त्यांच्याच हस्ताक्षरातील आहे, असा निष्कर्ष हस्ताक्षर तज्ज्ञांनी दिला आहे, असे मत न्या. चांदीवाल यांनी व्यक्त केले व सुनावणी किल्ला कोर्टात सुरू करण्याचे निर्देश दिले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad