मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा, रेल्वे रुळांच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी मध्य रेल्वे मार्गावरील मेनलाइन आणि हार्बर मार्गावर रविवार, १४ जुलै रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेन लाइनवर कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर, हार्बर मार्गावरील पनवेल ते नेरूळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत.
मेन लाइनवर कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर सकाळी १0.४0 ते दुपारी ३.४0 वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे कल्याण ते ठाणे दरम्यानची अप जलद मार्गावरील वाहतूक अप धीम्या मार्गावरून चालवण्यात येणार आहे. त्यामुळे अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवरील वाहतूक सुमारे १५ ते २0 मिनिटे उशिराने होणार आहे. तसेच मुंबईत येणार्या सर्व मेल-एक्स्प्रेस गाड्या कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावरून चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे आपल्या निर्धारित वेळेपेक्षा त्या २0 मिनिटे उशिराने मुंबईत दाखल होणार आहेत. हार्बर मार्गावर पनवेल ते नेरूळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवरील वाहतूक सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तसेच ट्रान्स हार्बर मार्गावरील पनवेल ते नेरूळ दरम्यानची अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूकही सकाळी ११.0५ ते दुपारी ३.१९ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. परिणामी, पनवेल-अंधेरी लोकल गाड्यांची वाहतूकही बंद असणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसटी ते नेरूळ आणि ठाणे ते नेरूळ मार्गावर लोकल गाड्या चालवण्यात येणार आहेत. तसेच ब्लॉक काळात हार्बर मार्गावरील लोकल सुमारे २0 मिनिटे उशिराने धावणार आहेत. ब्लॉक काळात लोकल गाड्या सुमारे १५ ते २0 मिनिटे उशिराने धावतात. परिणामी, गाड्यांना प्रचंड गर्दी होते. त्यामुळे प्रवाशांनी प्रचंड गर्दी असलेल्या लोकलमधून प्रवास करू नये, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.
उपनगरीय रेल्वेच्या दुरुस्तीसाठी पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली ते गोरेगाव स्थानकांदरम्यान रविवारी जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी १0.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. ब्लॉकदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील सर्व लोकल गाड्या बोरिवली ते गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरून चालवण्यात येणार आहेत.

No comments:
Post a Comment