मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील गटनेत्यांना अनेक वेळा पालिका प्रशासनाच्या विविध खात्यांकडे समाजोपयोगी कामांसाठी पत्रव्यवहार करावा लागतो. यासाठी या गटनेत्यांना प्रशासनाकडून ही कामे करण्यासाठी कनिष्ठ लघुलेखक आणि वृत्त निवेदक (मराठी) उपलब्ध करून देण्यासाठी सात अतिरिक्त पदे वाढवण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत येणार असून त्यानंतर प्रत्यक्षात सात पदे भरण्याची कार्यवाही सुरू केली जाईल.
राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ यांनी पालिका आयुक्तांकडे गटनेत्यांना लघुलेखक आणि वृत्तनिवेदक (मराठी) देण्याची मागणी केली होती. गटनेत्यांसाठी पालिका प्रशासनाकडून पक्ष कार्यालय आणि दूरध्वनीची व्यवस्था देण्यात आली आहे. गटनेत्यांकडे मुंबईतून विविध समस्यांची निवेदने येत असतात. तसेच त्यांच्या दैनंदिन भेटी असतात. संबंधितांनी गटनेत्यांना केलेला पत्रव्यवहार पालिका प्रशासनाच्या संबंधित खात्यांकडे शिफारशीत करावा लागतो. उपरोक्त कामांबरोबरच गटनेते पालिका सभागृह तसेच इतर कमिटींचे सदस्य म्हणून कामाकाजासंबंधी काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करत असतात. काही माहिती संबंधित खात्याकडून मिळवायची असते. या सर्व कामांसाठी पालिका प्रशासनाने प्रत्येक गटनेत्याला एक कनिष्ठ लघुलेखक आणि वृत्तनिवेदक (मराठी) पुरवण्यात यावा अशी मागणी धनंजय पिसाळ यांनी गटनेत्यांच्या बैठकीत केल्यानंतर या मागणीस दुजोरा देत प्रशासनाकडून ही मागणी मान्य करण्यात आली.
No comments:
Post a Comment