चित्रपट कलाकारांसाठी बस सेवा सुरू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 July 2013

चित्रपट कलाकारांसाठी बस सेवा सुरू



मुंबई : शिवसेना चित्रपट संघटनेने मढ आयलंड येथे चित्रीकरण करणार्‍या मराठी टीव्ही कलाकारांसाठी बस सेवा सुरू करण्याची मागणी महापौरांकडे केली होती. त्यानुसार, सोमवारी अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या हस्ते आणि युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या तसेच शिवसेना चित्रपट संघटनेचे अध्यक्ष आदेश बांदेकर व बेस्ट समितीचे अध्यक्ष नाना आंबोले यांच्या उपस्थितीत बस सेवेला दादर शिवाजी पार्क येथील महापौर बंगला येथून हिरवा झेंडा दाखवण्यात आला. मढ येथे रात्री उशिरापर्यंत चित्रीकरण सुरू असते. रात्री उशिरा शिफ्ट संपवून घरी जाणार्‍या कलाकारांची त्यामुळे मोठी गैरसोय होत होते. परिणामी, येथून एक बस सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना चित्रपट संघटनेचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांच्याकडे केली होती. त्यानुसार, ही बस सेवा सुरू करण्यात आली असून त्यामुळे कलाकारांची मोठी सोय होणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad