गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना मुंबईतच मोफत घर द्या! २२ जुलै रोजी लॉंग मार्च - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 July 2013

गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना मुंबईतच मोफत घर द्या! २२ जुलै रोजी लॉंग मार्च

मुंबई - महाराष्ट्र शासनाने केवळ एक-दोन गिरणी कामगार संघटनांना हाताशी धरून ७.५० लाख रुपयांचा भुर्दंड लादलेल्या ६९२५ घरांची लॉटरी काढली. या वाढीव किमतीमुळे लाखो उद्ध्वस्त गिरणी कामगार आजही बेघरच आहेत. त्यामुळे सर्वच गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना मुंबईतच मोफत घरे द्या या मागणीसाठी ‘गिरणी कामगार एकजूट’च्या वतीने २२ जुलै रोजी सकाळी १०.०० वाजता वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान (राणी बाग) ते आझाद मैदान असा लॉंग मार्च काढण्यात येणार आहे. लॉटरीत म्हाडाकडे अर्ज केलेल्या उर्वरित सुमारे १ लाख ४१ हजार कामगारांच्या घराबाबत शासनाकडून ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. शिवाय गिरणी कामगारांच्या वारसांनाही घरे देण्याबाबत धोरण ठरवले जात नाही. सरकारच्या या अन्यायकारक धोरणाविरोधात हा लॉंग मार्च काढण्यात येणार आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad