परिपत्रकाशिवाय मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद; मनविसे आक्रमक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 July 2013

परिपत्रकाशिवाय मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद; मनविसे आक्रमक

मुंबई : शैक्षणिक वर्ष २0१३-१४ करिता दूरस्थ शिक्षण विभागात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती सवलत कोणत्याही परिपत्रकाशिवाय बंद केलेली आहे. ही सवलत बंद करणे मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय असून ही सवलत पुन्हा सुरू करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना एका पत्राद्वारे केली आहे. याप्रकरणी तातडीने निर्णय घ्यावा; अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा मनविसेने दिला आहे.

मुंबई विद्यापीठातील दूरस्थ शिक्षण विभागात हजारोंच्या संख्येने विविध अभ्यासक्रमास विद्यार्थी प्रवेश घेत असतात. यात गरजू आणि होतकरू मागासवर्गीय विद्यार्थी आपल्या परिस्थितीनुसार पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. अशा दूरस्थ शिक्षण विभागाकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना समाजकल्याणतर्फे देण्यात येणारी शिष्यवृत्ती सवलत गेली अनेक वर्षे मिळत होती, मात्र शैक्षणिक वर्ष २0१३-१४ करिता दूरस्थ शिक्षण विभागातर्फे मिळणारी शिष्यवृत्ती सवलत बंद करण्यात आली आहे. याला जबाबदार दूरस्थ संचालक डॉ. हरिश्‍चंद्र असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे करण्यात आला आहे. समाजकल्याण विभाग आण मुंबई विद्यापीठातर्फे कोणतेही परिपत्रक काढले नसताना डॉ. हरिश्‍चंद्र यांनी कोणत्या आधारावर स्वत:चा मनमानी कारभार करून हजारो मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती सवलत बंद केली आहे, असा सवाल मनविसेने केला असून शैभक्षणिक वर्षाचे प्रवेश सुरू असताना मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर हा मोठा अन्याय असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, ही सवलत लवकरात लवकर शैक्षणिक वर्षात सुरू करावी व डॉ. हरिश्‍चंद्र यांच्यावर अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा; अन्यथा नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराच मनविसेने दिला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad