सुमार दर्जाचे रेनकोट देऊन पोलिसांना छत्री वापरण्यास बंदी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 July 2013

सुमार दर्जाचे रेनकोट देऊन पोलिसांना छत्री वापरण्यास बंदी

मुंबई  - ऊन असो की पाऊस, पोलिसांनी कायम सुरक्षा व्यवस्थेत तैनात असावे, अशी त्यांच्याकडून अपेक्षा केली जाते. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिस आयुक्तांनी पोलिसांना पावसात छत्री न वापरण्याचे निर्देश दिले आहेत. 

पावसात ड्यूटी करताना महिला, पुरुष पोलिसांनी केवळ रेनकोटचाच वापर करण्याचे निर्देश पोलिस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी 93 पोलिस ठाण्यांना लिहिलेल्या पत्रात दिले आहेत. छत्री न वापरण्यामागचे कारण देण्यात आले नाही. मात्र, सेवेत असताना पोलिसांचे दोन्ही हात मोकळे राहावेत हा त्यामागचा उद्देश असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

रस्त्यावरील वाढत्या गुन्ह्यांमध्ये पोलिसाच्या एका हातात वॉकीटॉकी किंवा काठी असेल आणि दुसर्‍या हातात छत्री असेल तर पोलिस कामात तत्परता दाखवू शकत नाही. समोर गुन्हा घडत असेल तर हातात छत्री धरलेल्या पोलिसांना त्या ठिकाणी तातडीने धाव घेता येणार नाही, असे पोलिस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. छत्र्यांपेक्षा रेनकोटचा वापर सोयीस्कर आहे, असे गुन्हे शाखेचे उपायुक्त सत्यनारायण चौधरी यांनी सांगितले. छत्री धरलेल्या पोलिसाचा काही प्रकरणांमध्ये गैरफायदा घेण्यात आल्याचे दिसून आले आहे. यामध्ये चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्याचा समावेश आहे. रेनकोट घातलेले पोलिस मंगळसूत्र चोरीतील आरोपींना रोखू शकतात. 

छत्रीच्या वापराबाबत पोलिसांमध्ये मतभिन्नता आहे. 2010 मध्ये आम्हाला रेनकोट पुरवण्यात आले. तीन वर्षांतून एकदा दिले जाणारे रेनकोट सुमार दर्जाचे असतात, असे एका वाहतूक पोलिसाने सांगितले. रेनकोटचे सोडा, आम्हाला नियमित वापराचे पोशाखाचे पैसेही अदा केले जात नसल्याचे अन्य कॉन्स्टेबलने सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad