मुंबई : येत्या ४८ तासांत जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा एसएमएस सध्या अनेकांच्या मोबाईलवर येत आहे; परंतु तो 'फेक' असून अशा एसएमएसला भीक घालू नका, असे स्पष्ट करत अशा अफवांपासून सावधान राहण्याचा इशाराच मुंबई महानगरपालिकेने मुंबईकरांना दिला आहे. मुंबईत सोमवारी रात्रीपासून संततधार पाऊस पडत असला तरीही पालिकेने केलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे मुंबईत कमी प्रमाणात पाणी साचल्याचा दावाही पालिकेने केला आहे. मंगळवारी दुपारपासून बृहन्मुंबईतील नागरिकांना तसेच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना मुंबईत येत्या ४८ तासांत ३ तासांहून जास्त जोरदार पर्जन्यवृष्टी होणार असून मुलांना शाळेत पाठवू नये, तसेच लांबचा प्रवास टाळावा, अशा आशयाचा अफवा पसरवणारा एसएमएस पाठवण्यात आला होता. त्याबाबत पालिका प्रशासनाने लगेचच पुढाकार घेऊन खुलासा केला आहे. अशा प्रकारचा कोणताही एसएमएस महाराष्ट्र पोलीस अथवा बृहन्मुंबई महानगरपालिकेने पाठवलेला नाही. तसेच अशा प्रकारचा खोटा प्रचार / प्रसार करणारी माहितीही देण्यात आलेली नाही, असेही मुंबई महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे. अफवा पसरवणार्यांवर गुन्हा दाखल ज्या व्यक्ती / संस्था यांनी अशा एसएमएसद्वारे मुंबईकर नागरिकांमध्ये खोट्या अफवा पसरवल्या आहेत, त्यांच्याविरुद्ध राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन कायदा २00५ मधील कलम क्रमांक ५४ अन्वये कारवाई करावी, अशी मागणी मनपाने केली असून याबाबतचा गुन्हा मुंबई पोलिसांच्या सायबर सेल युनिटकडे महापालिका आपत्कालीन नियंत्रण कक्षाचे प्रमुख महेश नार्वेकर यांनी दाखल केला आहे. याबाबत मुंबई पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. त्यानुसार, संबंधित व्यक्ती / संस्था यांना अशा प्रकारची अफवा पसरवणारी खोटी माहिती दिल्याबद्दल एक वर्षाची कैद तसेच दंडही होऊ शकतो, असेही मनपाने स्पष्ट केले आहे. |
Post Top Ad
24 July 2013
Home
Unlabelled
अतवृष्टीच्या 'फेक' एसएमएसपासून सावधान
अतवृष्टीच्या 'फेक' एसएमएसपासून सावधान
Share This
About Anonymous
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment