इंदूर - मध्य प्रदेशातील महाकाल येथून मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या आजपासून (सोमवार) सुरू झालेल्या जनआशिर्वाद यात्रेवेळी लावण्यात आलेल्या पोस्टरवरून गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपच्या प्रचार समितीचे अध्यक्ष नरेंद्र मोदीचे चित्र गायब असल्याचे दिसून आले.
मध्य प्रदेश भाजप कार्यालयाच्या वतीने हे पोस्टर लावण्यात आले आहे. या पोस्टरवरून मोदींच्या जवळ असलेल्या सर्वच नेत्यांना वगळण्यात आले आहे. मात्र, शिवराजसिंह चौहान यांचे समर्थक आणि लालकृष्ण अडवानी यांच्या गटाचे असलेल्या नेत्यांचे चित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.
या सर्व प्रकरणावरून भाजपमधील पंतप्रधान पदावरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषीत करण्याच्या तयारीत आहेत. पण, शिवराजसिंह चौहान मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून स्वीकारण्यास तयार नसल्याचे बोलले जात आहे. प्रदेश भाजपकडून प्रसिद्ध करण्यात येत असलेल्या दूरचित्रवाणीवरील जाहिरातीतही अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवानी यांच्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह, सुषमा स्वराज, राज्याचे प्रभारी अनंत कुमार, प्रदेशाध्यक्ष नरेंद्र सिंह यांचे छायाचित्रे येतात. यामध्येही मोदींचा समावेश करण्यात आलेला नाही.
No comments:
Post a Comment