मोदी पंतप्रधान होऊ नयेत : अमर्त्य सेन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 July 2013

मोदी पंतप्रधान होऊ नयेत : अमर्त्य सेन

नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये जे आर्थिक विकासाचे मॉडेल राबवले ते मला अर्थशास्त्रज्ञ म्हणून अयोग्य वाटते. म्हणूनच मोदी पंतप्रधान होऊ नयेत, अशी माझ्या भारतीय मनाची इच्छा आहे, असे विधान नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ डॉ. अमर्त्य सेन यांनी केले आहे.

सीएनएन-आईबीएन या वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत डॉ. सेन यांनी हे विचार व्यक्त केले. या मुलाखतीत त्यांनी मोदींचा हा विकास सर्वसमावेशक नसल्याचा मुद्दा अधोरेखित केला. समाजातील मागास आणि अल्पसंख्य घटकाला मोदींच्या विकासामध्ये सुरक्षित वाटत नाही, असे ते म्हणतात.

विकासाला सामाजिक बदलांपासून वेगळे करता येत नाही. फक्त उच्च विकास दर हा गरीबी निर्मुलनाचा उपाय होऊ शकत नाही. त्यासाठी सर्वसमावेशक विकास महत्त्वाचा आहे. असे सांगत डॉ. सेन यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची स्तुती केली आहे.

नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्या मॉडेलमधील कोणते मॉडेल देशासाठी योग्य यावर सध्या अर्थशास्त्रज्ञांमध्ये चर्चा सुरू आहे. त्यामुळे डॉ. सेन यांनी मोदींच्या मॉडेलवर टीका करून नितीश कुमार यांची केलेली स्तुती फक्त अर्थशास्त्राच्या दृष्टीने नव्हे तर राजकीय दृष्टीनेही महत्त्वाचे मानली जात आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad