मंत्रालयातच मागासवर्गीयांवर अन्याय - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 July 2013

मंत्रालयातच मागासवर्गीयांवर अन्याय

mantralaya.jpg
फुले शाहू आंबेडकर यांचे सतत नाव घेत मागासवर्गीय जनतेच्या मतावर निवडून येवून राज्य करणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकार कडून मंत्रालयातील मागासवर्गीयांची हजारो पदे रिक्त असतानाही हि पदे भरलीच जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते आनंद पारगावकर यांनी मंत्रालयातील रिक्त पदांची माहिती मागितली होती. आधी माहिती देण्यास नकार देण्यात आला परंतु नंतर अपिलात गेल्या नंतर मंत्रालयातील सर्वच विभागातील रिक्त पदांची माहिती देण्यात आली आहे. मिळालेल्या माहिती नुसार   मंत्रालयामध्ये जो काही रिक्त पदांचा अनुशेष आहे हा सर्व मागासवर्गीयांचा आहे हि विचार करण्या सारखी गोष्ट आहे.  

मंतारालायाकडून मिळालेल्या माहिती नुसार आदिवासी विभागातील सरळ सेवेची अ वर्गातील २५ मंजूर पदांपैकी १५ रिक्त होती त्यापैकी १० पदे भरली आहेत १५ पदांचा अनुशेष होता आता अनुशेष नसल्याचे सांगण्यात आले आहे. ब वर्गात ७१ पदे मंजूर होती त्यापैकी ३७ पदे भरली  असून ३४ पदे रिक्त आहेत सध्या एकाच पदाचा अनुशेष बाकी असल्याचे सांगण्यात आले आहे. क वर्गात ८७८२ पदे मंजूर आहेत त्यापैकी ७३७३ पदे भरली आहेत तर १४००९ पदे रिक्त आहेत सध्या २८२ पदांचा अनुशेष बाकी आहे. ड वर्गात ८८४१ पदे मंजूर असून ६५३७ पदे भरली आहेत तर २३०४ पदे रिक्त आहेत सध्या ७५४ पदांचा अनुशेष बाकी आहे. पदोन्नती मध्ये अ वर्गात ३८ पदांपैकी ४ पदांचा अनुशेष बाकी आहे. ब वर्गात ७९ मंजूर पदांपैकी ४ पदांचा अनुशेष बाकी आहे. क  वर्गामध्ये २४३४ मंजूर पदांपैकी १३७ पदांचा अनुशेष  बाकी आहे. ड वर्गात १ पद मंजूर असून ते पदही अद्याप आदिवासी विभागाने भरलेले नाही. 

गृह विभागामध्ये सरळसेवेची अ वर्गाची ८९२ पदे मंजूर असून एका पदाचा अनुशेष बाकी आहे. ब वर्गामध्ये ६७१० पदे मंजूर असून एकही पदाचा अनुशेष नसल्याचे कळवण्यात आले आहे, क वर्गाची १७६२०२ पदे मंजूर असून २८९१ पदांचा अनुशेष बाकी आहे. ड़ वर्गाची १६११० पदे मंजूर असून ३५६ पदांचा अनुशेष सध्या बाकी आहे. पदोन्नतीची अ वर्गामध्ये ४४८८ पदे अंजूर असून ७ पदांचा अनुशेष बाकी आहे. ब वर्गात ७२४९ पदे अम्न्जूर असून १८५ पदांचा अनुशेष बाकी आहे. ड वर्गाची १०५८७७ पदे मंजूर असून ३४३ पदांचा अनुशेष बाकी आहे. ड वर्गाची २५४ पदे मंजूर असून १४ पदांचा अनुशेष बाकी आहे. 

उच्च व तंत्र शिक्षण विभागामध्ये अ वर्गाची ४४६६ पदे अंजूर असून १२५ पदांचा अनुशेष सध्या बाकी आहे. ब वर्गात ७७१ पदे मंजूर असून ३२ पदांचा अनुशेष बाकी आहे. क वर्गात १२४०९ पदे मंजूर असून ४७८ पदांचा अनुशेष बाकी आहे. ड वर्गात ७०९७ पदे मंजूर असून २०७ पदांचा अनुशेष बाकी आहे. पदोन्नतीची अ वर्गात ६७८ मंजूर पदांपैकी  २६ पदांचा अनुशेष बाकी आहे. ब वर्गात ५३५ पदे मंजूर असून ९ पदांचा अनुशेष बाकी आहे. क वर्गाची ५४६४ मंजूर पदांपैकी १६९ पदांचा अनुशेष बाकी आहे. तर ड वर्गाची १६४ पदे अम्न्जूर असून ४ पदांचा अनुशेष बाकी आहे. 

मंत्रालयामध्ये  आदिवासी विभाग, गृह विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग या तिन विभागामध्ये मागासवर्गीयांची हजारो पदे रिक्त आहेत. हि पदे रिक्त असल्याने आदिवासी समाजातील लोकां पर्यंत सरकारी योजना पोहचवून त्या राबवण्यामध्ये अडचणी येत आहेत, आदिवासी लोकांची कित्तेक कामे संथ गतीने होत आहेत. गृह विभागामध्ये पदे रिक्त असल्याने मागासवर्गीय लोकांवर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होत असताना ज्या मंत्रालयीन विभागाकडून कारवाही करणे गरजेचे आहे त्या गृह विभागामध्ये मागासवर्गीयाची पदे रिक्त आहेत. उच्च शिक्षण मागासवर्गीयांना मिळत नसताना ज्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून कारवाही करणे अपेक्षित असताना या विभागामध्ये सुद्धा मागासवर्गीयांची पदे रिक्त ठेवण्यात आली आहेत. 

सदर पदे रिक्त असताना महाराष्ट्रा मध्ये राज्य करणाऱ्या व सतत फुले शाहू आंबेडकर यांचे सतत नाव घेणाऱ्या आघाडी सरकार मधील काँग्रेस राष्ट्रवादी पक्षांचे हि रिक्त पदे भरण्याकडे दुर्लक्ष होत आहे. या तीनही विभागामध्ये हजारो पदे रिक्त असताना सरकार चालवणारे  काँग्रेस राष्ट्रवादी वाले जसे दुर्लक्ष करत आहेत तसेच मागासवर्गीयांच्या नावाने उघडलेल्या संस्था, युनिअन व पक्ष तसेच त्यांचे प्रमुख यांचे सुद्धा दुर्लक्ष होत आहे. मागासवर्गीयांची हजारो पदे रिक्त असताना मागासवर्गीयांची हि रिक्त पदे लवकरात लवकर भरवित या साठी सरकारवर दबाव आणण्याची गरज आहे.  

अजेयकुमार जाधव 
Mob. No.- 09969191363

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad