मुंबईच्या डबेवाल्यांसाठी पालिका रुग्णालयात विशेष सोय करण्याची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 July 2013

मुंबईच्या डबेवाल्यांसाठी पालिका रुग्णालयात विशेष सोय करण्याची मागणी

मुंबई : मुंबईच्या डबेवाल्यांचा तब्बल १२0 वर्षांचा इतिहास असून, त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरही गौरवण्यात आलेले आहे, मात्र त्यांचे काम करताना त्यांच्या स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊन त्यांना अनेक संसर्ग रोगांना बळी पडावे लागते. खासगी रुग्णालयांची महागडी सेवा त्यांना परवडत नसल्याने महानगरपालिकेतर्फे मुंबईतील डबेवाल्यांस पालिका रुग्णालयात स्वतंत्र आरोग्य कक्ष स्थापन करून महिन्यातील एक दिवस त्यांच्या मोफत वैद्यकीय चिकित्सेसाठी ठेवण्यात यावा व त्यांना वाजवी दरात औषधोपचार पुरवण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी नगरसेवक दीपक पवार यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे. 

व्यवस्थापन शास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून डबेवाल्यांच्या व्यवसायाकडे जगभरातून मान्यता मिळालेली आहे. सद्यस्थितीत दररोज दोन लाख मुंबईकरांच्या जेवणाचे डबे पोहचवण्याचे जिकरीचे काम हे डबेवाले करत असतात. सुमारे ५ लाख डबेवाले हे काम अत्यंत कुशलतेने सांभाळत आहेत. स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्यासही त्यांना वेळ नसतो त्यामुळे ते अनेक संसर्गजन्य रोगांना बळी पडतात. अत्यंत तुटपुंजा पैसा या व्यवसायातून त्यांना मिळत असल्याने आजारी पडल्यास खाजगी रुग्णालयांत उपचार घेणे त्यांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. ही वस्तुस्तिथी पाहता एकप्रकारे मुंबईकरांची सेब करणार्‍या या डबेवाल्यांसाठी मुंबई महानगरपालिकेने पालिका रुग्णालयात त्यांच्यासाठी स्वतंत्र आरोग्यकक्ष स्थापन करून महिन्याचा एक दिवस वैद्यकीय चिकित्सेसाठी ठेवावा तसेच त्यांना अल्प दरात औषधोपचार करण्यात यावे, अशी मागणी दीपक पवार यांनी केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad