मुंबई : राज्यातील बौद्धांच्या पवित्र स्थळांची सुरक्षा केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या हवाली सोपविण्यात यावी, या आणि इतर मागण्यांसाठी आंबेडकरी विचार मोर्चाने गुरुवारी आझाद मैदानात आंदोलन केले. या वेळी संघटनेचे संस्थापक नारायण बागडे, मुंबई अध्यक्ष दिलीप कदम आणि बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
बिहार येथील महाबोधी मंदिरात नुकतेच साखळी बॉम्बस्फोट झाले होते. त्यामुळे राज्यातील बौद्ध ठिकाणांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. चैत्यभूमी, दीक्षाभूमी, महाड चवदार तळे, भीमा कोरेगाव स्तंभ, अजिंठा-वेरूळ लेणी आणि इतर बौद्ध ठिकाणे राज्यात आहेत. बिहार येथील बॉम्बस्फोटांची पुनरावृत्ती या ठिकाणी होऊ शकते. त्यामुळे संघटनेने केलेल्या मागण्यांचा सरकारने विचार करावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा बागडे यांनी दिला आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी राज्याच्या वार्षिक योजनेत राखून ठेवलेल्या ५00 कोटी रुपयांची रक्कम सार्वजनिक बांधकाम विभागाला उपलब्ध करून देण्याचा निर्देश जाहीर करणार्या उपसचिवांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बागडे यांनी या वेळी केली.
No comments:
Post a Comment