कोल्डमिक्स तंत्रज्ञानाने खड्डे भरणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 July 2013

कोल्डमिक्स तंत्रज्ञानाने खड्डे भरणार



मुंबई : पावसाळ्यात रस्त्यावर पडणारे खड्डे पालिका कोल्डमिक्स तंत्रज्ञानाने भरणार आहे. अतिरिक्त आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी घाटकोपर, पुष्पा विहार मार्गावर पडलेले खड्डे भरण्याच्या कामाची बुधवारी पाहणी केली. त्या वेळी त्यांनी याबाबतची माहिती दिली.

पावसाने उघडीप देऊन रस्ता सुकेपर्यंत रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी थांबावे लागत होते. पाऊस पडून गेल्यानंतर लगेचच रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी मनपाने कोल्डमिक्स तंत्रज्ञान म्हणजे वंडर पॅच प्रणालीचा वापर केला आहे. कोल्डमिक्स या प्रणालीचा ओल्या रस्त्यावर उपयोग होत असल्याने आता न थांबता खड्डय़ातील पाणी काढून लगेच काम सुरू करण्यात येत आहे. मोठे आणि छोटे असा भेदभाव न करता सर्व खड्डे प्राधान्याने भरावेत, असे आदेश श्रीनिवास यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले आहेत. परिमंडळ -६मधील एनएस व टी विभागातील सर्व सुविधांविषयक कामांचा या वेळी श्रीनिवास यांनी आढावा घेतला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad