नवी दिल्ली : आठ दशकांपासून देशवासीयांच्या कानावर अधिराज्य गाजवणार्या आकाशवाणीच्या बातम्या आता लवकरच मोबाईल फोनवर 'एसएमएस'च्या माध्यमातून मिळणार असल्याचे आकाशवाणीच्या अधिकार्यांनी सांगितले आहे.
आकाशवाणीची ही सेवा घेण्यासाठी तुम्हाला नोंदणी करावी लागणार असून नोंदणी प्रक्रियेची माहिती सेवा सुरू झाल्यानंतरच कळणार आहे.तब्बल आठ दशकांहूनही जास्त काळापासून भारताच्या कानाकोपर्यातील जनतेच्या सेवेत कार्यरत असणार्या तसेच सर्वाधिक विश्वासार्ह बातम्या पुरवणारी संस्था, असा नावलौकिक असलेल्या आकाशवाणीने विज्ञान-तंत्रज्ञानाच्या नव्या युगात कूस बदलायला सुरुवात केली असून आता लोकांना मोबाईलवर 'एसएमएस'च्या माध्यमातून बातम्या देण्यात येणार असल्याचे आकाशवाणीच्या अधिकार्यांनी सांगितले. या सेवेच्या माध्यमातून आकाशवाणीच्या नोंदणीकृत वापरकर्त्यांना दिवसातून तीन वेळेस ताज्या बातम्यांचे एसएमएस पाठवले जातील. प्रत्येक 'एसएमएस'मध्ये तीन ते चार मुख्य बातम्यांसोबत एक जाहिरातीचा वाक्यांश असेल. बातम्यांसाठी १00 शब्द तर जाहिरातीसाठी ६0 शब्द वापरले जातील. ही सेवा पुरवण्यासाठी आकाशवाणीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा लागणार आहे. आकाशवाणीची न्यूज सर्व्हिस घेणार्या सर्व ग्राहकांची माहिती साठवण्यासाठी अद्ययावत यंत्रणा आकाशवाणीला लागणार असून हे काम एखाद्या संस्थेला कंत्राट स्वरूपात दिले जाणार आहे. ही सेवा प्रदान करण्यासाठी ट्रायकडून बल्क मेसेज पाठवण्यासाठी परवानगी घेतल्याचीही माहिती सूत्रांनी दिली. ही सेवा सुरू केल्यामुळे आकाशवाणी आणखी जास्त लोकांपर्यंत पोहचेल, असा विश्वास अधिकार्यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment