मुंबई- दूषित पाण्यामुळे शहरात कॉलरा- गॅस्ट्रोची साथ फोफावल्याने नळातून येणारे पाणी थेट पिणे टाळा, ते उकळून प्या, उघड्यवरील अन्न खाणे टाळा, तसेच घरातील अन्न झाकून ठेवा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
काही दिवसांपासून शहरातील विविध भागांत दूषित पाणी येत आहे. काही ठिकाणी येणारे पाणी वर वर स्वच्छ दिसत असले तरीही त्यातून जंतुसंसर्ग होण्याची शक्यता आहे. शहरात ताप, खोकला, सर्दी यांचा जोर वाढत असतानाच गॅस्ट्रो, कावीळीची साथही जोरात सुरू आहे. त्यामुळे कोणत्याही ठिकाणचे पाणी थेट पिऊ नका, एका ठराविक तापमानास उकळवलेले पाणी थंड करून ते प्या, असा सल्ला डॉ. अभिजित पाटणेकर यांनी दिला आहे.
लहान मुलांना लवकर बाधा! एरवी कोणत्याही ऋतूमध्ये अनेकदा मुलांना जंतुसंसर्ग होतो. पावसात त्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे मुलांना, विशेषतः छोट्या बाळांना सर्दी, खोकला होण्याची शक्यता अधिक असते. पावसाळ्यात दमट वातावरणापासून जपण्यासाठी त्यांना कोरड्या जागी ठेवणे, ओले कपडे न घालणे, सर्दी-खोकला झाल्यास डॉक्टरी सल्ल्याने औषधोपचार सुरु करणे गरजेचे आहे, असा सल्ला बालरोगतज्ज्ञ डॉ. आशीष गोरसे यांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment