मुंबई : मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या घाटकोपर विभागातील असल्फा व्हिलेज व मोहिली व्हिलेज येथील डोंगराळ भागात अनधिकृतरीत्या राहणार्या रहिवाशांना म्हाडाकडून दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या वाढत्या घटनांमुळे म्हाडाकडून दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे
घाटकोपर पश्चिमेला असणारे असल्फा व्हिलेज सर्व्हे क्र. १ न भू. क्र. २८८ येथील ५0३७१ चौरस मीटर जागा व मोहिली व्हिलेज सर्व्हे क्रमांक ५७:८ न भू. क्र. २३0 येथील ५३८३४ चौरस मीटर जागा हे दोन्ही भाग डोंगराळ असून तीव्र उताराचे आहेत. हा भाग संपूर्णपणे अनधिकृत झोपड्यांनी व्यापलेला आहे. पावसाळ्यामध्ये डोंगराळ भागाची दरड कोसळून अपघात होऊन जीवित किंवा वित्तहानी होण्याची दाट शक्यता आहे. ही हानी टाळण्याच्या दृष्टिकोनातून या परिसरात अनधिकृतरीत्या धोकादायक स्थितीत राहत असलेल्या रहिवाशांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे आवाहन म्हाडाकडून करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment