मुंबई / अजेयकुमार जाधव
१ जुलै रोजी दुपारी आपल्या महाविद्यालयाच्या कामा निमित्त ठाण्यावरून सुटलेल्या लोकलमध्ये अशोक पवार, कैलास चव्हाण आपल्या मित्रांसह अपंगांच्या डब्यातून प्रवास करताना टिसी असल्याचे सांगून एक हजार रुपयांची मागणी केली. पवार व चव्हाण यांच्याकडील सर्व पैसे काढून घेतले. घाटकोपरला या विद्यार्थ्यांना कोणीतरी देत असल्याचे लक्षात आल्यावर येथील जागृत नागरिकांनी या टिसी कडे ओळखपत्र मागितले असता त्याने तेथून पाल काढला. परंतु नागरिकांनी त्याला पकडून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
अटक केलेल्या आरोपीचे नाव अफझल खान आहे. तो जे. एन.पी.टी.च्या जसाई यार्ड येथे पॉईन्टमन म्हणून कामाला असून सेन्ट्रल रेल्वे वसाहत, जी.टी.बी. नगर, सायन कोळीवाडा येथे राहणारा आहे. त्याच्या सोबतचा महेश रहाटे हा यावेळी पळून गेला असून पोलिसांनी त्याला लवकरच पकडू असे सांगितले आहे. पोलिसांनी या तोतया टिसी कडून रोख रक्कम व त्याचे ओळख पत्र जब्त केले असून या व्यक्तीने जर कोणाची फसवणूक केली असल्यास कुर्ला पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन वरिष्ट पोलिस निरीक्षक एस. एस. धुमाळ यांनी केले असून अशा प्रकारे कोनाकडून या इसमाने पैसे घेतले असल्यास
त्वरीप कुर्ला रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
No comments:
Post a Comment