महाबोधी विहार परिसरात 8 साखळी स्‍फोट / 5 जण जखमी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 July 2013

महाबोधी विहार परिसरात 8 साखळी स्‍फोट / 5 जण जखमी

बिहार : महाबोधी मंदिरावर दशहवादी हल्‍ला, महाराष्‍ट्रात हायअलर्टबिहार : महाबोधी मंदिरावर दशहवादी हल्‍ला, नऊ स्फोटांनी हादरले बुद्धगया
मुंबई / अजेयकुमार जाधव 
बिहार बुद्धगया येथे आज (रविवार) सकाळी महाबोधी विहार परिसर 8 साखळी स्‍फोटांनी हादरला. या स्‍फोटांमध्‍ये 5 जण जखमी झाले असून मंदिराच्‍या परिसरातून 2 जिवंत बॉम्‍ब आढळून आले आहेत. ते निकामी करण्‍यात यश आले आहे. हा दहशतवादी हल्‍ला असल्‍याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्‍पष्‍ट केले आहे. 

स्‍फोटांमुळे महाबोधी वृक्षाचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने हल्‍ल्‍यात प्राणहानी झालेली नाही. दोन परदेशी बौद्ध भिख्‍खू मात्र गंभीर जखमी आहेत. दहशतवादी हल्‍ल्यासंदर्भात इशारा देण्‍यात आला होता. परंतु, तो गांभीर्याने घेण्‍यात आला नसल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. विहाराच्‍या सुरक्षेत अनेक ठिकाणी त्रुटी आढळल्‍या आहेत.

महाबोधी विहारावर झालेल्‍या या हल्‍ल्यानंतर महाराष्‍ट्रातही हायअलर्टचा इशारा देण्‍यात आला आहे. राज्‍यातील धार्मिक स्‍थळांची सुरक्षा वाढविण्‍याच्‍या सूचना देण्‍यात आल्‍या आहेत. नागपुरातील दिक्षाभूमी परिसरातही सुरक्षा वाढविण्‍यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार स्फोटांची तीव्रता जास्त नव्हती. केंद्रीय राखीव पोलिस दल आणि अग्निशमक दल घटनास्थळी दाखल झाले आहे. जखमींना गया मेडीकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. महाबोधी विहाराला रिकामे करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, तपास सुरु करण्यात आला आहे. तपासांतीच स्फोटांचे नेमके कारण स्पष्ट करता येईल. विहाराच्‍या परिसरात 4 स्‍फोट झाले. तर 3 स्‍फोट कर्मापा मंद‍िरात झाले.

महाबोधी विहार परिसरात सकाळी 5.25  ते 5.  58 वाजेपर्यंत हे स्फोट झाले. त्यावेळी विहारात भंतेजी आणि सफाई कामगार होते. ज्या ठिकाणी स्फोट झाले तेथेही जास्त गर्दी नव्हती त्यामुळे मोठी जीवितहानी टळल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. विहाराचे कोणतेही नुकसान झालेले नाही. म्‍यानमार आणि तिबेटच्‍या प्रत्‍येकी एका भिख्‍खूचा समावेश आहे.

या स्फोटांमध्ये दोन बौद्ध भिख्खू गंभीर जखमी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार एक ब्रम्हदेश आणि एक तिबेटचे रहिवासी आहे. ज्यावेळी स्फोट झाले तेव्हा दोन्ही भिख्खू प्रार्थना करीत होते. सुदैवाने विहाराच्या आतील भागात एकही स्फोट झालेला नाही.

अशीही माहिती आहे की, दोन महिन्यांपूर्वी दिल्लीत अटक करण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांकडून महाबोधी विहाराला लक्ष्य केले जाण्याची माहिती मिळाली होती. गुप्तचर संस्थेच्या माहितीनंतर राज्य सरकारला ही माहिती देण्यात आली होती. 15 दिवसांपूर्वीही विहार उडविण्याची धमकी दिली गेली होती. त्यानंतर येथील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली होती मात्र, धमकी देणा-याचा माग पोलिस काढू शकले नाही.

बुद्धगया येथे बॉम्बनाशक पथक दाखल झाले आहे. त्यांनी एक जिवंत बॉम्ब शोधून काढला आहे. स्फोट कमी तिव्रतेचे असल्याचे सांगितले जात आहे. येथील भगवान बुद्धांच्या 80 फूट उंच मुर्तीजवळही एक स्फोट झाला आहे. हा हल्ला कोणी केला या बद्दल अजून माहिती मिळालेली नाही. केंद्रीय गृहमंत्रालयाने हा दहशतवादी हल्ला असल्याची शक्यता वर्तवली आहे. पाटणा येथून फॉरेन्सिक टीम बुद्धगयाकडे रवाना झाली आहे.

रविवारी बुद्धगया येथे विशेष प्रार्थनेचे आयोजन केले जाते. त्यासाठी मोठी गर्दी येथे होते. विहार परिसरात बॉम्ब अशा ठिकाणी पेरण्यात आले होते जिथे मोठ्या प्रमाणात गर्दी होती. याचा अर्थ या स्फोटाद्वारे मोठा घातपात घडवून आणण्याची तयारी होती. गेल्या काही महिन्यापासून विहार उडविण्याची धमकी दिली जात होती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad