कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे आंदोलन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 June 2013

कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे आंदोलन

मुंबई : राज्य कामगार विमा योजना आयुक्तालयातील भ्रष्टाचारविरुद्ध महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. या वेळी महासंघाचे सी. के. जाधव व राजेश सोनवणे आदी पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या महासंघाच्या आंदोलनाला सफाई कामगार नेते खेमचंद सोलंकी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पाठिंबा दिला आहे. खाजगी व्यवसाय भत्ता, नियमबाह्य नोकरभरती, औषध खरेदी घोटाळा या व आदी चौकशी सुरू असलेल्या प्रकरणांबाबत हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या वेळी बोलताना सोलंकी म्हणाले, ८६ सफाई कामगारांना एकतर्फी निर्णय घेऊन त्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या आहेत. वारसा हक्काच्या भरतीबाबत सार्वजनिक आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांनी एका बैठकीचे आयोजन केले होते, मात्र त्या बैठकीतही काही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे हे कामगार आज अनेक समस्यांना सामोरे जात आहेत, असे सोलंकी म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad