मुंबई - रिपाइंची शिवसेना व भाजपसोबत युती असून या महायुतीत आमच्या पक्षाला लोकसभेच्या ५, तर विधानसभेच्या ३५ जागा हव्यात, अशी मागणी रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली. मात्र जागांची आम्ही मागणी केली असली तरी त्याविषयी प्रथम चर्चा करायला हवी. या चर्चेतून मग जागा कमी-जास्त होऊ शकतात अशी तयारी आठवलेंनी दर्शवली.
मंत्रालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आठवले यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘लोकसभेच्या पाचपैकी किमान दोन जागा आमचे उमेदवार निवडून येतील अशा द्यायला हव्यात. महायुतीतील मित्रपक्ष म्हणून रिपाइंला ताकद देण्याची जबाबदारी शिवसेना व भाजपची आहे. रामटेक, लातूर, पुणे, कल्याण, दक्षिण -मध्य मुंबई अशा पाच लोकसभा जागांची रिपाइं उमेदवार उभे करण्यास उत्सुक आहे.’
मनसे स्वतंत्र लढल्यास सत्ताधार्यांनाच फटका!मनसे महायुतीत सहभागी न झाल्यास त्याचा फटका विरोधी पक्षांना बसेल, असा विचार सत्ताधारी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंगे्रस करत असेल तर तो भ्रम ठरणार आहे. मनसे विरोधी पक्षांची नव्हे तर कॉंगे्रस व राष्ट्रवादीची मते खाईल आणि त्याचा त्यांना मोठा फटका बसेल, असे मत आठवले यांनी व्यक्त केले.

No comments:
Post a Comment