‘बेस्ट’च्या चालक-वाहकांना मोबाइल बंदी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 June 2013

‘बेस्ट’च्या चालक-वाहकांना मोबाइल बंदी

मुंबई - ‘बेस्ट’च्या चालक-वाहकांना या पुढे बसमध्ये मोबाइलवर बोलता येणार नाही. ते जर मोबाइलवर बोलताना आढळले तर त्यांचा मोबाइल जप्त केला जाणार असून, त्यांना विभागीय चौकशीलाही सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे बसमध्ये त्यांना मोबाइल बंद (स्विच ऑफ) ठेवावा लागणार आहे. त्याबाबतचे एक परिपत्रक वाहतूक उपव्यवस्थापकांनी काढले आहे.
‘बेस्ट’चे चालक-वाहक अनेकदा बस चालू असतानाही मोबाइलवर बोलताना आढळतात. चालकांचे अशा वेळी बस चालवण्याकडे लक्ष नसते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. तर वाहक मोबाइलवर बोलण्याच्या नादात प्रवाशांना तिकीट देण्यास विसरतात. तर कधी हिशेबात गोंधळतात. याबाबत प्रवाशांच्या अनेक तक्रारी बेस्ट प्रशासनाकडे आल्या आहेत. त्याची दखल घेऊन वाहतूक विभागाने नवीन परिपत्रक काढले आहे. त्यानुसार बसमध्ये असताना बेस्ट चालक-वाहकांना मोबाइलवर बोलता येणार नाही. शिवाय तो जवळ ठेवताना त्यांना बंद करून ठेवावा लागणार आहे.
वाहतूक अधिकारी आणि तिकीट निरीक्षक चालक-वाहकांवर लक्ष ठेवणार असून, जर मोबाइल सुरू असल्याचे आढळल्यास तो जप्त केला जाईल. त्याचबरोबर त्यांना विभागीय चौकशीलाही सामोरे जावे लागणार आहे. प्रवाशांनाही चालक- वाहक मोबाइलवर बोलताना आढळल्यास १८००२२७५५० या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करता येईल. त्यानंतर संबंधितांविरोधात कारवाई केली जाणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad