मुंबई - सोलापूर जिल्ह्याच्या पाण्यासाठी १२१ दिवस आंदोलन केल्यानंतरही सरकार दाद देत नसल्याचे भय्या देशमुख यांनी आज पावसाला साकडे घालत गाढवाचे लग्न लावले. कॉंग्रेस पुत्र झुठबोले गाढव आणि राष्ट्रवादीची सुकन्या जलचोरी गाढवीण यांचा विवाह रुईया आणि पोद्दार महाविद्यालयासमोरील मैदानात सोलापूरच्या शेतकर्यांच्या साक्षीने धडाक्यात पार पडला. ऐनवेळी पोलिसांनी हजेरी लावत यजमान भय्या देशमुख यांच्यासह वर्हाडी मंडळीची वरात थेट माटुंगा पोलीस ठाण्यात नेली.
उपोषण, आत्मदहनाचा प्रयत्न यासारखी आंदोलने केल्यानंतरही सरकारने दाद दिली नाही. सोलापूर जिल्ह्याच्या उजनी धरणाचे पाणी उजव्या व डाव्या कालव्यात सोडण्यात आले नाही. यामुळे अखेर पावसाला साकडे घालण्याचे ठरविले. महाराष्ट्रात सध्या दुष्काळ आहे. सरकार पाणी असून ते देण्यास असमर्थ आहे. तेव्हा देवा आता तूच पाऊस पाड, असे साकडे घालत गाढव-गाढवीणीचे लग्न लावून देण्यात आले. ऐनवेळी तिथे उपस्थित झालेल्या पोलिसांनी या लग्नात विघ्न निर्माण केले. त्यामुळे ढोल-ताशे न वाजवताच घाईघाईने हे लग्न उरकण्यात आले. अखेर पोलिसांनी भय्या देशमुख आणि वर्हाडी मंडळींना ताब्यात घेऊन थेट माटुंगा पोलीस ठाण्यात नेले.
तूर्त आंदोलन स्थगितसलग १२१ दिवस आंदोलन केल्यानंतरही सरकारने दाद दिली नाही. सरकारला शेतकर्यांविषयी अजिबात आपुलकी नाही. तेव्हा आता देवा तूच पाऊस पाड, असे सांगत भय्या देशमुख यांनी तूर्त आंदोलन स्थगित करीत असल्याचे स्पष्ट केले. जर पाऊस पडला नाही तर पुन्हा आंदोलन अधिक तीव्रतेने सुरू करू, असे भय्या देशमुख यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment