मुंबई : मुंबईत जोरदार पाऊस झाला की अनेक सखल भागांमध्ये पाणी साचते. यादरम्यान मुंबईत विद्युत पुरवठा खंडित होण्याचे आणि विजेचा झटका बसून अपघात होण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. हीच बाब लक्षात घेऊन विजेचा हा झटका टाळण्यासाठी बेस्ट उपक्रमाने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. इतकेच नाही तर तक्रारींचे निवारण करण्यासाठी जागोजागी अतिरिक्त कर्मचार्यांची नेमणूक केली असून २४ तास कार्यरत असणारे तसेच सुट्टीच्या दिवशी शनिवारी आणि रविवारीही वीज ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करणारे कॉल सेंटर कार्यरत केले आहे.
|
पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साठणे आणि वाहतुकीची कोंडी होणे आदी घटना घडतात आणि खंडित झालेला विद्युत पुरवठा पूर्वपदावर आणण्यासाठी विलंब झाला की नागरिकांच्या त्रासाला पारावार राहात नाही. कॉल सेंटरवर तक्रार नोंदवताना वीजग्राहकांना केवळ त्यांचा वीज ग्राहक क्रमांक अथवा वीजमापन क्रमांक नोंदवावा लागेल. वीजग्राहक क्रमांक हा नऊ आकडी उदाहरणार्थ १२३-५५८-0१९ असा असून विद्युत देयकाच्या अगदी वरील बाजूस उजवीकडे छापलेला आहे. तसेच वीजमापन क्रमांक हा विद्युत देयकाच्या प्रथमदर्शनी बाजूस परंतु डावीकडे आणि वीजग्राहकाचे नाव पत्याच्या खाली आहे. दोनपैकी एक क्रमांक नोंदवताना आपल्या जवळ बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, वीजग्राहक विद्युत पुरवठा खंडित होणे आणि इतर तक्रारींसाठी (उदा. विजेचा झटका बसणे, ठिणग्या उडणे इ.) यासाठी दूरध्वनी क्रमांक २२८४३९३९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment