ठाणे : मंत्रिमंडळामध्ये फेरबदल करणे हे पक्षप्रमुख म्हणून शरद पवार यांचा अधिकार असला तरी राज्यात काँग्रेसला टक्कर देण्यासाठीच राष्ट्रवादीने मंत्रिमंडळामध्ये फेरबदल केल्याची प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये नेहमीच सत्ता संघर्ष असून, दोघांच्या भांडणामध्ये महायुतीला सत्ता मिळणार असल्याचा आशावाद आठवले यांनी व्यक्त केला. ठाणे महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील पूर्णाकृती पुतळय़ाच्या अनावरण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. नरेंद्र मोदी यांची पक्षाच्या प्रचार समितीचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली असून, त्यांचा चेहरा निवडणूक जिंकण्यासाठी योग्यच असल्याची उपरती आठवले यांना झाली. राज्यासह ठाणे महापालिकेत महायुतीचा आरपीआय हा महत्त्वाचा घटक आहे. ठाणे महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील पूर्णाकृती पुतळय़ाच्या अनावरण कार्यक्रमाला आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्यासह राज्यमंत्री राजेंद्र गावीत, महापौर हरिश्चंद्र पाटील, रामदास आठवले, आमदार एकनाथ शिंदे, नानासाहेब इंदिसे, बाळकृष्ण पूर्णेकर व मोठय़ा संख्येने नागरिक उपस्थित होते. या पुतळ्याचे अनावरण डॉ. एन. आनंद महाथेरो यांच्या हस्ते आणि भदंत आर्यनाग अतदश्री यांच्या उपस्थितीत करण्याचे ठरले. |
Post Top Ad
10 June 2013
Home
Unlabelled
काँग्रेसला टक्कर देण्यासाठीच राष्ट्रवादीचे फेरबदल - आठवले
काँग्रेसला टक्कर देण्यासाठीच राष्ट्रवादीचे फेरबदल - आठवले
Share This
About Anonymous
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment