आनंदराज आंबेडकरांची सिद्धार्थ कॉलेजमध्ये घुसखोरी! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 June 2013

आनंदराज आंबेडकरांची सिद्धार्थ कॉलेजमध्ये घुसखोरी!

खोटी कागदपत्रे सादर केली, रामदास आठवलेंचा आरोप
मुंबई - आनंदराज आंबेडकर यांनी सिद्धार्थ कॉलेजमध्ये घुसखोरी केली आहे. दादागिरी करत कॉलेजचा ताबा मिळवताना त्यांनी खोटी कागदपत्रे सादर केल्याचा आरोप रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केला. 
पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा आनंदराज यांनी घेतलेला ताबा अवैध असून घुसखोरी करणार्‍यांना बाहेर काढण्याची मागणी आठवले यांनी बुधवारी गृहमंत्री आर. आर. पाटील यांची मंत्रालयात भेट घेऊन केली. आठवले यांनी केलेल्या मागणीचा नक्की विचार केला जाईल, असे आश्‍वासन गृहमंत्र्यांनी दिल्याचे आठवले यांनी सांगितले. 
गृहमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आठवले म्हणाले, ‘आनंदराज यांनी खोटी कागदपत्रे सादर करूनही पोलिसांनी ती मान्य केली आणि त्यांच्या घुसखोरीविरोधात कोणतीही कारवाई केली नाही, उलट रिपाइंच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली. 
‘पीपल्स एज्युकेशनच सोसायटीचे चेअरमन होण्याची माझी इच्छा नाही. मात्र दादागिरी करून कोणी हे पद बळकावणार असेल तर ते सुद्धा आम्ही खपवून घेणार नाही. या वादाबाबत २८ जूनला कोर्टाचा निर्णय होणार असून तोपर्यंत आमचे कार्यकर्ते कोणाला आत जाऊ देणार नाहीत, असे आठवले यांनी स्पष्ट केले. 

मोक्याच्या जागेसाठी भांडणं - राजेश टोपेसिद्धार्थ कॉलेजची मुंबईप्रमाणे संभाजीनगर येथे एक शाखा आहे. या दोन्ही जागा मोक्याच्या ठिकाणी आहेत. त्या मिळवण्यासाठी सध्याची भांडणं सुरू असल्याची टीका उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी केली. मात्र ही भांडणं व्यवस्थापन पातळीवरील असल्याने आमचा विभाग त्यात हस्तक्षेप करू शकत नाही. मात्र याबाबत धर्मादाय आयुक्तांशी पत्रव्यवहार केला जाईल. या प्रकरणाचा लवकर निपटारा करावा अशी विनंती केली जाईल, असे टोपे म्हणाले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad