मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निलंबित आमदार राम कदम यांना घाटकोपरच्या पंतनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबई महानगर पालिकेचे अभियंता महेश पाटील यांना केलेल्या मारहाण प्रकरणी ही कारवाई केली असून राम कदम यांना विक्रोळी न्यायालयात हजर केले असता त्यांना २४ जून पर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
कदम यांच्यावर पंतनगर पोलिस ठाण्यात गुन्हे नोंद क्रमांक २१/ २०१३ अंतर्गत भा. द. वि. कलम १०७,३५३, १४१, १४३, १४७, १४९, ३३६, ३३२, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सरकारी कामात हस्तक्षेप, कर्तव्यावर असलेल्या सरकारी अधिका-याला धमकावणे, मारहाण करणे, जीवे मारण्याची धमकी आणि शिवीगाळ केल्याचा कदम यांच्यावर आरोप आहे. यापूर्वी विधीमंडळाचे अधिवेशन चालू असताना विधान भवनातच पोलिस अधिकारी सचिन सुर्यवंशी याला बेदम मारहाण प्रकरणी राम कदम यांना निलंबित केले होते.
No comments:
Post a Comment