शहिदांचे गुण आपल्यात उतरवा! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 June 2013

शहिदांचे गुण आपल्यात उतरवा!

मुंबई : शहिदांच्या आठवणींवर कृतज्ञतेची भावना नको तर त्या शहिदांच्या गुणांचा काही अंश आपल्यात कसा येईल हीच त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ठरेल. हल्लीची पिढी इतिहासाचे वाचन फार कमी करतेय. अशा या हिंदुस्थानातील भारतात जीवनातील अनेक गोष्टी संपत चालल्या आहेत, अशी खंत माजी न्यायामूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी सोमवारी प्रेस क्लब येथे व्यक्त केली. १८५७ ते १९४७ या काळातील शहीद व त्यांचे आजचे वारस व समाज या घटकावर शिवनाथ झा यांनी 'मार्टेस' या नावाचे पुस्तक प्रेस क्लब येथे धर्माधिकारी यांच्या हस्ते प्रकाशित केले. जालियानवाला बाग हत्याकांड, बेपत्ता असलेले सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद, सतेंद्रनाथ बासू, झाशाची राणी, मंगल पांडे, रामचंद्र पांडुरंग टोपे, सुखदेव, राजगुरू, भगतसिंग या व आदी हजारो शहिदांच्या जीवनकार्याचा व त्यांच्या आजच्या पिढीचा आढावा या पुस्तकात घेतला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad