दिल्लीत मान्सूनने मोडला ५३ वर्षांचा विक्रम - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 June 2013

दिल्लीत मान्सूनने मोडला ५३ वर्षांचा विक्रम

नवी दिल्ली : राजधानीत पूर्वनियोजित वेळेच्या १३ दिवस आधीच धडकून मान्सूनने गेल्या ५३ वर्षांचा वेळेआधीच दाखल होण्याचा विक्रम मोडीत काढला आहे. वेळेच्या आधीच धडकलेल्या मान्सूनने दिल्लीत ठिकठिकाणी पाणी साचले. त्यामुळे मेट्रो रेल्वेसह सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला. जुलैच्या १५ तारखेपर्यंत मान्सून संपूर्ण भारताला सामावून घेणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने वर्तवले आहे, तर दिल्लीसह उत्तर भारतात रविवारी पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे उत्तराखंडमध्ये झालेल्या पावसात ३ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे.

या वर्षी दाखल झालेल्या मान्सूनने १६ जून रोजीच जवळपास संपूर्ण देश व्यापला आहे. यापूर्वी अशा पावसाची नोंद २१ जून १९६0 मध्ये झाली होती. त्यानुसार, पावसाने ५३ वर्षांचा विक्रम मोडल्याचे सांगण्यात येत आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, या वर्षी दिल्लीत २९ जून रोजी मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता, मात्र १३ दिवस आधीच धडकून मान्सूनने गरमीपासून त्रस्त झालेल्या दिल्लीकरांना दिलासा दिला. गेल्या वर्षी मान्सूनने दिल्लीत दाखल होण्यासाठी ८ दिवसांचा विलंब लावला होता, तर २0१0 मध्ये मान्सूनची वेळ २६ जून असूनही राजधानीत ५ जुलै रोजी पाऊस झाला. गेल्या ३0 वर्षांत सर्वात समाधानकारक पाऊस २00८ मध्ये नोंदवला गेला, तर १९८७ साली दिल्लीत मान्सून दाखल होण्यास एका महिन्याचा काळ लोटला होता. हवामान विभागाच्या माहितीप्रमाणे, नवी दिल्लीत ६५४.७ मि.मी. पाऊस समाधानकारक मानला जातो. या वर्षी दिल्लीत सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहणार असल्याचे वर्तवण्यात आले आहे. तसेच जुलै १५ पर्यंत संपूर्ण भारतात पावसाचे समाधानकारक आगमन होणार आहे. जुलै महिन्यापर्यंतच देशात १0१ टक्के इतका पाऊस पडणार आहे, तर ऑगस्टमध्ये सरासरी ९६ टक्के पाऊस नोंदवला जाईल, असेही वेधशाळेने सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad