कोकणचा प्रवास पावसातही बिनधास्त - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 June 2013

कोकणचा प्रवास पावसातही बिनधास्त


मुंबई - पावसाळ्यात वारंवार कोसळणार्‍या दरडींचे प्रमाण रोखण्यासाठी कोकण रेल्वेने यंदाही बंदोबस्ताचे चिलखत घातले आहे. चाकरमान्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी अनेक धोकादायक ठिकाणी कोसळणार्‍या दरडींपासून बचाव करण्यासाठी संरक्षक जाळी बसविण्यात आल्या असून काही ठिकाणी सुरक्षा भिंतीही उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात चाकरमान्यांचा प्रवास बिनधोक होणार आहे.

कोकणात पावसाळ्यात तुफान पर्जन्यवृष्टी होते. तासाला ८० मिमी. इतका पाऊस पडतो. अशा पावसात कोकण रेल्वे मार्गालगत असणार्‍या डोंगरमाथ्यावरून दरडी कोसळण्याच्या वारंवार घटना घडतात. त्यामुळे ट्रॅकचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन वाहतूक विस्कळीत होते.
पावसात अशा प्रसंगांची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता त्यावर उपाययोजना शोधण्यासाठी कोकण रेल्वेने विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती नेमली होती. या समितीने केलेल्या शिफारसीनुसार ८७ ठिकाणी पुढील कामे करण्यात आली आहेत.

चौदा वर्षांत २९२ कोटी खर्च
पावसाळ्यात कोसळणार्‍या दरडी, भूस्खलन आणि पाण्याचा निचरा यावर उपाययोजना करण्यासाठी कोकण रेल्वेच्या वतीने दरवर्षी विविध उपाययोजना हाती घेतल्या जातात. गेल्या चौदा वर्षांत म्हणजेच १९९९ ते २०१३पर्यत अशा संरक्षकविषयक योजना हाती घेण्यासाठी कोकण रेल्वेने तब्बल २९२.५२ कोटी रुपये खर्च केले असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
- जमिनीची धूप रोखण्यासाठी उताराच्या ठिकाणी झाडे लावली.
- कोसळणार्‍या दरडींसाठी जाळी बसविल्या.
- धोकादायक ठिकाणी सुरक्षा भिंती उभारल्या.
- ट्रॅकच्या दोन्ही बाजूला पाणी वाहून जाण्यासाठी नाले बांधले.
- बोगद्याच्या प्रवेशद्वारावर भूस्खलन होऊ नये याकरिता कॉक्रीटीकरण


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad