लोकसभा निवडणुकीपूर्वी विधानसभा मतदारसंघाच्या मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात येणार आहे. १ जानेवारी २0१४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचे पुनर्रिक्षण कार्यक्रमांतर्गत १ सप्टेंबर २0१३ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याचे प्रस्तावित आहे. त्यापूर्वी मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण करण्याचे राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकार्यांचे आदेश आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी कामाला लागले आहेत.
निवडणूक आयोगाने २0१४च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेऊन २0१३ हे वर्ष 'मतदार यादी पुनर्रिक्षण वर्ष' म्हणून घोषित केले आहे. त्याअनुषंगाने १ जानेवारी २0१४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादी पुनर्रिक्षण कार्यक्रमांतर्गत १ सप्टेंबर २0१३ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याचे प्रस्तावित आहे. तत्पूर्वी, मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण केले जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्रामीण भागांतील एका मतदान केंद्रात जास्तीत जास्त १२00 व शहरी भागातील एका मतदान केंद्रात जास्तीत जास्त १४00 मतदार असणे आवश्यक आहे, मात्र अनेक मतदारसंघांचे ग्रामीण भागांतील १२00 व शहरी भागातील १४00 पेक्षा जास्त मतदार असल्याने त्यांचे भागाचे सुसूत्रीकरण तथा विभाजन करण्यात येणार आहे. तसेच ३00 पेक्षा जास्त मतदार असलेल्या गावांत मतदान केंद्र नसल्यास नवीन मतदान केंद्र त्या गावात तयार करण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment